नवी दिल्ली/मुंबई (Gold Price Today) : पावसाळ्यात सोन्या-चांदीच्या दरात वाढ होत आहे. काल सोन्याच्या दरात मोठी उसळी पाहायला मिळाली. आजही सोन्याच्या भावात वाढ सुरूच आहे. मात्र, गेल्या आठवडाभरात सोन्याच्या दरात घसरण झाली होती. या आठवड्यात पुन्हा एकदा सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून सोने हा उत्तम पर्याय आहे. सोने किंवा चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर सोन्या-चांदीच्या ताज्या किमती जाणून घ्या.
मिस्ड कॉलद्वारे सोन्याची किंमत तपासा
आज भारतात सोन्याचा भाव 22 कॅरेट सोन्यासाठी 6,635 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा प्रति ग्रॅम 7,238 रुपये आहे. तर भारतात 10 ग्रॅम चांदीची किंमत 915 रुपये आहे. 100 ग्रॅम चांदीची किंमत 9,150 रुपये आणि 1 किलो चांदीची किंमत 91,500 रुपये आहे. सोन्याच्या नवीनतम किंमती तुम्ही सहज शोधू शकता. यासाठी फक्त मिस कॉल करावा लागेल. 8955664433 वर मिस कॉल देऊन 22 कॅरेट सोन्याचा आणि 18 कॅरेट सोन्याचा दर जाणून घेऊ शकता. मिस कॉल करताच तुम्हाला एक एसएमएस येईल, ज्यामध्ये सोन्याच्या दराविषयी माहिती दिली जाणार आहे.