नवी दिल्ली/मुंबई (Gold Rate Today) : आज सोन्या-चांदीच्या दरात (Gold Price today) मोठा बदल झालेला आहे. मात्र, मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याचे भाव स्थिर आहेत. अशा परिस्थितीत, जर सोने खरेदी करायचे असेल किंवा सोन्यात गुंतवणूक करायची असेल, तर त्याआधी आज सोन्या-चांदीची किंमत (Gold rate Today) जाणून घ्या. भारतात आज 22 कॅरेट सोन्याची किंमत 6,765 रुपये प्रति ग्रॅम आहे आणि 24 कॅरेट सोन्याची (999 सोने म्हणून ओळखले जाते) किंमत 7,380 रुपये प्रति ग्रॅम आहे. तर भारतात 10 ग्रॅम चांदीची किंमत 948 रुपये आहे. 100 ग्रॅम चांदीची किंमत 9,480 रुपये आणि 1 किलो चांदीची किंमत 94,800 रुपये आहे.
मुंबईत 22 कॅरेट सोन्याचा भाव 6,765 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव 7,380 रुपये प्रति ग्रॅम आहे. आज दिल्लीत 22 कॅरेट सोन्याचा भाव 6,780 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव 7,395 रुपये प्रति ग्रॅम आहे. आज कोलकातामध्ये 22 कॅरेट सोन्याचा भाव 6,765 रुपये प्रति ग्रॅम (Gold rate Today) आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव 7,395 रुपये प्रति ग्रॅम आहे. आज चेन्नईमध्ये 22 कॅरेट सोने 6,820 प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोने 7,440 प्रति ग्रॅम आहे.
जाणून घ्या मिस्ड कॉलद्वारे सोन्या-चांदीची किंमत
मिस्ड कॉलद्वारे सोन्या-चांदीची किंमतही तपासू शकता. 22 कॅरेट सोन्याचे आणि 18 कॅरेट सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी तुम्ही 8955664433 वर मिस कॉल करू शकता. मिस्ड कॉल करताच सोन्याच्या दराची माहिती एसएमएसद्वारे मिळणार आहे. भारतातील (Gold rate Today) सोन्या-चांदीच्या किमती अनेक घटकांवर अवलंबून असतात. ज्यामध्ये डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य समाविष्ट असते. सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये दिसणारा कल ठरवण्यात जागतिक मागणी देखील महत्त्वाची भूमिका बजावते.