नवी दिल्ली/ मुंबई (Gold Rate Today) : आज सोन्याच्या दरात कोणतेही चढ-उतार दिसून आले नाहीत. आज सोन्याचे भाव स्थिर राहिले. सोन्याच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. त्याचबरोबर चांदीचे भावही स्थिर राहिले आहेत. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर आज सोन्याचे भाव स्थिर आहेत. (India price) देशातील बहुतांश शहरांमध्ये 10 ग्रॅम सोन्याचा भाव सुमारे 73 हजार रुपये आहे. तर एक किलो चांदीची किंमत 94 हजार 400 रुपये आहे.
अशा परिस्थितीत, सोने खरेदी करायचे असेल (Gold Silver Price) किंवा सोन्यात गुंतवणूक करायची असेल, तर त्याआधी 11 जुलै 2024 रोजी सोन्या-चांदीची किंमत जाणून घ्या. आज सोन्या-चांदीचे दर काय आहेत? आज चेन्नईत 10 ग्रॅम सोन्याचा दर 73,740 रुपये आहे. येथे (Gold Rate Today) सोन्याच्या भावात मागील दिवसांच्या तुलनेत 100 रुपयांनी घट झाली आहे. तर दिल्लीत 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत 73,720 रुपये आहे. तर मुंबईत 24 कॅरेट सोन्याचा भाव 73,570 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर मुंबईत 22 कॅरेट सोन्याचा भाव 67,090 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
जाणून घ्या, मिस्ड कॉलद्वारे सोन्या-चांदीचे भाव
मिस्ड कॉलद्वारे तुम्ही सोन्या-चांदीची किंमतही तपासू शकता. 22 कॅरेट सोन्याचे आणि 18 कॅरेट सोन्याचे दर (Gold Rate Today) जाणून घेण्यासाठी तुम्ही 8955664433 वर मिस कॉल करू शकता. तुम्ही मिस्ड कॉल करताच तुम्हाला सोन्याच्या दराची माहिती एसएमएसद्वारे मिळेल. भारतातील सोन्या-चांदीच्या किमती (Gold Silver Price) डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या मूल्यासह अनेक घटकांवर अवलंबून असतात. सोने आणि (Gold- Silver) चांदीच्या किमतींमध्ये दिसणारा कल ठरवण्यात जागतिक मागणी देखील महत्त्वाची भूमिका बजावत आहे.