नवी दिल्ली/ मुंबई (Gold Rate Today) : सध्या लग्नाचा मोसम सुरू आहे. अशा परिस्थितीत अनेक दिवसांपासून सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी ही एक चांगली संधी आहे. आज बुधवारी सोन्याच्या दरात काहीशी घसरण झाली आहे. सोन्या-चांदीच्या दरात (Gold Rate Today) मात्र चढ-उतार सुरूच आहेत. लोक नेहमी सोन्यात गुंतवणूक करत आले आहेत. आज 19 जून 2024 रोजी सोन्या-चांदीच्या किमती जाणून घ्या.
आज भारतात, 22 कॅरेट सोन्याची किंमत 6,634 रुपये प्रति ग्रॅम आहे आणि 24 कॅरेट सोन्याची (999 सोने म्हणून ओळखले जाते) किंमत 7,246 रुपये प्रति ग्रॅम आहे. भारतात 10 ग्रॅम चांदीची किंमत 916 रुपये आहे. 100 ग्रॅम चांदीची किंमत 9,160 रुपये आणि 1 किलो चांदीची किंमत 91,600 रुपये आहे. मिस्ड कॉलद्वारे तुम्ही (Gold Rate Today) सोन्या-चांदीची किंमत देखील तपासू शकता. 22 कॅरेट सोन्याचे आणि 18 कॅरेट सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी तुम्ही 8955664433 वर मिस कॉल करू शकता. तुम्ही मिस्ड कॉल करताच तुम्हाला सोन्याच्या दराची माहिती एसएमएसद्वारे मिळणार आहे.
देशातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याचा भाव किती?
चेन्नई: ₹6,696 (22K), ₹7,305 (24K)
मुंबई: ₹6,619 (22K), ₹7,221 (24K)
दिल्ली: ₹6,634 (22K), ₹7,246 (24K)
कोलकात: ₹6,619 (22K), ₹7,221 (24K)
हैदराबाद: ₹6,619 (22K), ₹7,221 (24K)
बेंगलुरु: ₹6,619 (22K), ₹7,221 (24K)
पुणे: ₹6,619 (22K), ₹7,221 (24K)