अर्जुनी मोर (Gondia):- गेली 70 वर्षापासून शासनाच्या अन्यायकारी विविध धोरणाबाबत गोंड गोवारी जमातीचे अनेक दिवसापासून संविधानिक व लोकशाही मार्गाने आंदोलन सुरू आहेत. न्याय मागणीसाठी सुरू असलेल्या लढ्यात शासन केवळ चल ढकल धोरण आखत असून समाजाला न्यायापासून वंचित ठेवत असल्याचा ठपका ठेवते आज गोंड गोवारी समाजाच्या हजारो लोकांनी अर्जुनी मोर क्षेत्राचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांच्या कार्यालयासमोर घेराव केला व निवेदन सादर केले वृत्त असेकी 26 जानेवारी 2024 रोजी आदिवासी सविधानीक गोंड गोवारी संघर्ष कृती समिती महाराष्ट्र तर्फे नागपूर येथील सविधान चौकात 17 दिवस आमरण उपोषण करण्यात आला होता.
संविधान चौकात एक दिवस आंदोलन
दरम्यान दिनांक 10 फरवरी 2024 रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथील सह्याद्री गृहावर बैठक घेऊन गोड गोवारी जमातीच्या संविधानिक अभ्यास करण्यासाठी सेवानिवृत्त न्यायधीज के .एस. वळणे यांचे अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करून सहा महिन्याच्या आत सकारात्मक अहवाल शासनास सादर करण्यास कळविली होते. मात्र सदर समितीने सहा महिने लोटून सुद्धा अहवाल सादर न केल्याने आदिवासी गोंड गोवारी जमात संविधानिक हक्क संघर्ष कृती समितीमार्फत चार सप्टेंबर 2024 रोजी पुन्हा नागपूर येथील संविधान चौकात एक दिवस आंदोलन करण्यात आले होते. सदर आंदोलन दरम्यान शासनाकडून नियोजित कालावधीत अहवाल संबंधात कार्यवाही व्हावे असे मागणी करत आव्हान देण्यात आले होते.
सकारात्मक अहवाल न मिळाल्या सात तारखेपासून पुन्हा बेमुदत उपोषण
जर ६ तारखेला सकारात्मक अहवाल न मिळाल्या सात तारखेपासून पुन्हा बेमुदत उपोषण(hunger strike) करण्याचा इशारा देण्यात आला मात्र आदिवासी विभाग यांनी पुन्हा षडयंत्र करून दिनांक सात सप्टेंबर 2024 रोजी अचानक के एल वळने समितीला अहवाल सादर करण्यास दोन महिन्याचा अवधी देण्यासंदर्भात शासन निर्णय काढल्याने आदिवासी संविधानिक गोंड गोवारी समाजामध्ये पुन्हा असंतोष पसरला. त्यामुळे अर्जुनी मोर विधानसभेचे आमदार मनोहर चंदिकापूरे यांच्या कार्यालयासमोर जाऊन अर्जुनी मोर सडक अर्जुनी तालुक्यातील जवळपास तीन ते चार हजार गोंड गोवारी बांधव यांनी आमदार यांना घेराव घातला व घडलेल्या प्रकरणाबाबत जाब विचारला. यावेळी शासन निर्णय जाळून आमदाराच्या समोर होडी करण्यात आली व महाराष्ट्र शासनाचा जाहीर निषेध करण्यात आला यावेळी तालुक्यातील तीन ते चार हजार गोंड गोवारी आदिवासी बांधव उपस्थित होते.