अवंती चौक येथील घटना
गोंदिया (Gondia Accident) : गोंदिया टी-पॉईट ते तिरोडा मार्गावरील अवंती चौकात (Gondia Police) जिल्हा पोलिस दलाच्या विशेष पथकाच्या वाहनाला मागून आयसर ट्रकच्या चालकाने लापरवाहीने चालवून धडक दिली. त्याचबरोबर चार ते पाच दुचाकींना चिरडले. या घटनेत एका इसमाचा मृत्यू झाला तर पोलिस अधिकारी, कर्मचार्यांसह पाच जण जखमी झाले आहेत. ही घटना आज (ता.२२) सकाळी ११ वाजता सुमारासची आहे. सर्व जखमींना उपचारासाठी खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींमध्ये विशेष पोलिस पथकाचे पोनि दिनेश लबडे, (Gondia Police) पोलिस कर्मचारी तथा चालक मुरलीधर पांडे यांचा समावेश आहे. साहिल कुडमेथे रा.चंद्रपूर असे मृताचे नाव आहे.
एकाचा मृत्यू तर पाच इसम जखमी
जिल्हा विशेष (Gondia Police) पोलिस पथकाचे पोनि दिनेश लबडे हे काही कर्मचार्यांसोबत वाहन क्र.एम.एच.१२/एस.क्यु-१००६ जात होते. अवंतीबाई चौक जवळील व्दारका लॉन येथील रेल्वे क्रासिंगसमोर वाहन थांबले. दरम्यान मागून येणार्या आयसर ट्रक क्र.एमएच-३५/एजे-३३०६ च्या चालकाने लापरवाहीने चालवून पोलिस वाहनाला मागून जब्बर धडक दिली. धडक एकढी जोरदार होती की, पोलिस वाहनाजवळचे इतर चार ते पाच दुचाकीही या (Gondia Accident) अपघातात चिरडले गेले. त्याचबरोबर पोलिस वाहनात बसलेले अधिकारी व कर्मचारी वाहनातून बाहेर फेकले गेले. दुचाकीच्या एका चालक पोलिस वाहनाखाली आल्याने त्याचा मृत्यू झाला तर पोलिस अधिकारी, कर्मचार्यासह इतर दुचाकी वाहनाचे पाच जण जखमी झाले. या घटनेमुळे मार्गावर एकच धावपळ सुटली. दरम्यान सर्व जखमींना त्वरित उपचारासाठी नजिकच्या (Gondia Hospital) खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. तर दुसरीकडे अपघात घडताच ट्रकच्या चालकाने घटनास्थळावरून पळ काढले. या घटनेची नोंद रामनगर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
बेधुंद व अनियंत्रित वाहन चालविणार्यांची माहिती द्या; पोलिसांचे आवाहन
शहरातील तसेच जिल्ह्यातील अनेक रस्त्यांवर चारचाकी, (Gondia Accident) दुचाकी वाहन बेधुंद चालविताना वाहतूक नियमांचे पालन केले जात नाही. रहदारीच्या रस्त्यावर भरधाव वेगाने वाहन चालविताना आढळून आलेल्या वाहन चालकाची सुज्ञ नागरिकांनी एक जबाबदारी म्हणून पोलिस नियंत्रण कक्षाला माहिती द्यावी, असे आवाहन पोलिस विभागाकडून करण्यात आले आहे. पोलिस नियंत्रण कक्षाचे दुरध्वनी क्र.०७१८२-२६६१०० व डायल क्र.११२ असे आहे. या माध्यमातून अपघातावर वेळीच पायबंद घालता येईल, असेही (Gondia Police) पोलिस विभागाकडून विनंती करण्यात आली आहे.