एकाचा संघर्षात तर एकाचा अपघाती मृत्यू
सडक अर्जुनी (Leopard dead) : अर्जुनी मोरगाव तालुक्यातील बोदरा गावशिवारात एका नर बिबट मृतावस्थेत (Leopard dead) आढळला. ही घटना आज (ता.१) सकाळी ११.३० वाजता सुमारास निदर्शनास आली. या बिबट्याचा मृत्यू एका वाघाशी झालेल्या झुंजीत झाला असावा, असा अंदाज वर्तविला जात आहे. तर दुसरी घटना गोंदिया-तिरोडा मार्गावरील मजितपूर गावशिवारातील असून ३० सप्टेंबरच्या रात्री ९ वाजता सुमारास वाहन अपघातात एक बिबट ठार झाला. या दोन्ही घटनांमुळे वनविभागाचा एकच खळबळ उडाली आहे. उल्लेखनिय असे की, आठवडाभरापूर्वीच वनक्षेत्रात वाघाच्या संघर्षात दोन (Leopard dead) वाघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती.
वनक्षेत्रात आपले वर्चस्व गाजविण्याच्या नादात एका वाघाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. आठवडाभरापूर्वी (Leopard dead) दोन वाघ मृतावस्थेत आढळले. त्या दोन्ही वाघांचा मृत्यू दुसर्या वाघासोबत झालेल्या संघर्षात झाल्याचे समोर आले. या घटनेची शाई सुकली नाही की, आज (ता.१) सकाळी अर्जुनी मोरगाव वनपरिक्षेत्रातंर्गत येत असलेल्या बोदरा गावशिवारातील जंगलात एक बिबट मृतावस्थेत आढळला आहे. या घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी, वन्यजीव मित्र मुकूंद धुर्वे यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला असता घटनास्थळी एका वाघाच्या पायाच्या खुणा दिसून आल्यात.
तसेच मृत बिबट्यावर जखमा दिसून आल्या. त्यामुळे या बिबट्याचा मृत्यू (Leopard dead) वाघाशी झालेल्या झुंजीत झाला असावा? असा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. तर दुसर्या घटनेत एका बिबट्याचा मृत्यू वाहन अपघाताने झाल्याने बाब समोर आली आहे. काल (ता.३०) रात्री ९ वाजता सुमारास गोंदिया-तिरोडा मार्गावरील मजितपूर शिवारात अपघातात जखमी झालेल्या बिबट्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. दरम्यान वनविभागाच्या अधिकार्यांनी घटनास्थळ गाठून मृत बिबट्याला कुडवा येथील वनपार्कमध्ये आणून त्याच्यावर उत्तरीय तपासणी करण्यात आली. यावेळी वन्यजीव मित्र सावन बहेकार, रूपेश निंबार्ते यांच्यासह वनविभागाचे अधिकारी उपस्थित होते. या दोन्ही घटनांमुळे वनविभागात एकच खळबळ उडाली आहे.