गोंदिया-बल्लारशा मार्गावरील देवलगाव येथील घटना
गोंदिया (Railway Accident) : गोंदिया-बल्लारशा रेल्वे मार्गावरील देवलगाव-बाराभाटी रेल्वे पटरी मध्यनंतरी 2 दक्षिण दरम्यान रेल्वेच्या धडकेत (Railway Accident) एका इसमाचा मृत्यु झाल्याची घटना दि.20 जुलै रोजी दुपारी 12:30 वाजताच्या सुमारास घडली असुन नारायण सुदाम काळसर्पे वय 43 वर्ष रा.नवेगाव/बांध असे मृतक इसमाचे नाव आहे. तर मृतक नारायण हा नवेगाव/बांध येथील रहिवाशी असलेले मार्कंड नेवारे यांच्या शेतीच्या कामासाठी मजुरीवर गेला होता. शेत मालक नेवारे यांची शेती देऊळगाव येथे रेल्वे लाईन जवळ असुन नारायण ला लघवी लागली आणि रेल्वे लाईन ओलांडुन लघवी कडे गेला.
नारायण परत शेताकडे येत असतांना (Gondia-Ballarasha Train) गोंदिया कडुन बल्लारशा कडे जाणाऱ्या रेल्वेनी धडक दिली यात नारायणचा जागीच मृत्यु झाला याची माहिती रेल्वे व पोलीस प्रशासनाला देण्यात आली माहिती मिळताच रेल्वे व पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी नवेगाव/बांध ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
सदर घटनेची मर्ग नोंद करण्यात आली असुन मर्ग क्रमांक 15/2024 कलम 194 भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 दाखल केला आहे. (Gondia Police) ठाणेदार यांच्या आदेशाने सदर घटनेचा तपास नवेगाव/बांध पोलीसांनी चौकशीत घेतला आहे. मृत नारायणच्या पश्चात पत्नी,1 मुलगा व 1 मुलगी असा परिवार आहे. (Railway Accident) मृतकाच्या वारसांना शासनाने तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.