गोंदिया (Gondia Bribery ) : तक्रारकर्त्यांशी गैरअर्जदारासोबत झालेले भांडण व (Gondia Police) पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचलेले प्रकरणात मध्यस्थी करून दोघांची समजुत घालून वाद समेट करून दिला. या मोबदल्यात १० हजार रूपयाची लाच मागणार्या गोंदिया शहर पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकाला आज (ता.२६) लाचलुचपत विभागाने सापळा रचून जाळ्यात अडकविले. (Bribery Section) लाचखोर सपोउपनि याने तक्रारकर्त्याकडून ८ हजार रूपयाची लाच स्विकारली. अनिल फागुजी पारधी ( पद-सपोउपनि ब.क्र.६७१) रा.श्रीनगर गोंदिया असे आरोपीचे नाव आहे.
८ हजाराची लाच स्विकारली
सविस्तर असे की, तक्रारकर्ता ट्रॅक्टर चालक असून त्याच्याविरूध्द २४ मे रोजी गैरअर्जदाराने (Gondia Police) गोंदिया शहर पोलिस ठाण्यात तोंडी तक्रार केली. तक्रारीनंतर सपोउपनि अनिल फागुजी पारधी याने तक्रारकर्त्याशी संपर्क केले. दरम्यान दोघांचे भांडण आपसात समजुत घडविण्यासाठी आपण प्रयत्न केले. त्यामुळे (Gondia Crime) गुन्हा दाखल होणार नाही, या मोबदल्यात १० हजार रूपये लाचेची मागणी केली. दरम्यान तक्रारकर्त्याला लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली. यानुरूप सहनिशा केली असता सपोउपनि पारधी १० हजार रूपये लाच मागत असल्याचे समोर आले. त्यानुरूप आज (ता.२६) सापळा रचण्यात आला.
दरम्यान सपोउपनि याने तक्रारकर्त्यांकडून तडजोडीतून ८ हजार रूपये लाच स्विकारली. यामुळे (Bribery Section) लाचलुचपत विभागाने आरोपी सपोउपनि अनिल पारधी यांच्या विरूध्द गोंदिया शहर पोलिस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यातंर्गत गुन्हा नोंद करून अटक केली आहे. ही कारवाई (Gondia Police) पोलिस अधिक्षक राहुल माकनीकर, अप्पर पोलिस अधिक्षक सचिन कदम, संजय पुरंदरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधिक्षक विलास काळे, पोनि अतुल तवाडे, सफौ चंद्रकांत कर्पे, संजय बोहरे, मंगेश कहालकर, संतोष शेंडे, संतोष बोपचे, अशोक कापगते, प्रशांत सोनवाने, रोहिनी डांगे, दिपक बाटबर्वे यांनी केली.