गोंदिया (Gondia Crime) : शहर पोलीस स्टेशनअंतर्गत (Gondia City Police) भीमनगर सिंगलटोली संकुलमध्ये १७ जुलैच्या रात्री ८:३० वाजताच्या सुमारास तिघा मित्रांत वादातून दोघांनी मिळून तिसर्यावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना घडली. गंगाधर विजय चंद्रिकापुरे (४२) रा.लक्ष्मीनगर असे या (Gondia Crime) घटनेतील जखमीचे नाव आहे. जखमीला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.
सिंगलटोली येथील धक्कादायक घटना
भिमनगर पसिरातील सिंगलटोली संकूलात लक्ष्मीनगर येथील गंगाधर विजय चंद्रिकापुरे हा इतर दोन मित्रांसह गेला होता. दरम्यान क्षुल्लक कारणावरून त्यांच्या वाद निर्माण झाला. पाहता पाहत वाद विकोपाला गेला. त्यातच दोघांनी संगनमत करून गंगाधर याच्यावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केला. (Gondia Crime) हल्ला केल्यानंतर दोघेही आरोपी घटनास्थळावरून पसार झाले होते. पण पोलिसांनी त्यातील एक आरोपी प्रशांत वाघमारे याला डोंगरगड (छत्तीसगड) येथून मध्यरात्रीच्या सुमारास अटक केली. या प्रकरणातील दुसरा आरोपी हा रामटेकला पळून गेला आहे. (Gondia City Police) गोंदिया शहर पोलीस त्याच्या मागावर पाठवले आहे. सदर हल्ला हा तिघा मित्रांत बाचाबाचीनंतर घडलेल्या वादातून झाला असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना कळली असल्याचे गोंदिया शहर पोलीस निरीक्षक किशोर पर्वते यांनी सांगितले. विशेष म्हणजे, भीमनगर सिंगलटोली परिसरात धारदार शस्त्राने हल्ला होण्याची ही एका महिन्यातील दुसरी घटना आहे. या प्रकरणी फिर्यादी नितीन विजय चंद्रिकापुरे रा.झेंडा चौक याच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. पुढील तपास सपोनि सोमनाथ कदम करीत आहेत.
काही तासातच आरोपी जेरबंद
शहर पोलिस ठाण्यातंर्गत (Gondia City Police) सिंगलटोली परिसरात धारदार शस्त्राने गंगाधर चंद्रिकापुरे यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. या घटनेची दखल घेवून शहर पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपींचा शोध घेण्यासाठी पथक कामी लावले. दरम्यान अवघ्या काही तासातच घटनेतील आरोपी प्रशांत वाघमारे (३०) रा.सिंगलटोली याला डोंगरगढ वरून तर दुसरा आरोपी अविनाश ईश्वर बोरकर याला रामटेके येथून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. (Gondia Crime) दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता २२ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. ही कामगिरी स्थागुशाचे पोनि दिनेश लबडे यांचे नेतृत्वात सपोनि विजय शिंदे, आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस पथक तसेच पोनि किशोर पर्वते यांचे नेतृत्वात सपोनि सोमनाथ कदम, आणि गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस अधिकारी अंमलदार यांनी केली.