गोंदिया (Gondia Crime) : घरफोडी, चोरीच्या घटनांवर (Gondia burglary) आळा बसून आरोपीच्या मुसक्या आवळण्यासाठी (Gondia Police) पोलिस तपासकार्यात गुंतले आहेत. अशातच मुर्री येथील कुंदन कुटी मंदीर जवळ घरफोडी करणारे दोन आरोपी शहर पोलिसांच्या जाळ्यात अडकले. दरम्यान त्यांच्याकडून सोने-चांदीचे दागिण्यांसह १ लाख ८२ हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. ही कारवाई १ जून रोजी शहर पोलिसांनी केली. फरहान ईशाक कुरैशी (२०), आशिक नरेंद्र बंसोड (२०) दोन्ही रा.बाजपेयी वॉर्ड गौतमनगर असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नाव आहे.
दागिण्यांसह १.८२ लाखाचा माल हस्तगत
माहितीनुसार, नजिकच्या मुर्री येथील कुंदन कुटीजवळ राहत असलेल्या देवकीनंदन हनुमानप्रसाद अग्रवाल हे परिवारासह बाहेरगावी गेले होते. दरम्यान अज्ञात चोरट्यांनी २५ व २६ मे च्या रात्री दरम्यान (Gondia burglary) घराचे कुलूप तोडून कपाटातील लॉकर मधून सोन्या- चांदीचे दागिने व रोख ९० हजार रुपये असा एकूण २ लाख २० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता. या घटनेची नोंद (Gondia Police) गोंदिया शहर पोलिस ठाण्यात करण्यात आली होती. (Gondia Police) पोलिसांनी घटनेची नोंद करून आरोपींचा शोध घेणे सुरू केले. त्यातच सुत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार फरहान ईशाक कुरैशी (२०) व आशिक नरेंद्र बंसोड (२०) रा.बाजपेयी वार्ड, गौतमनगर यांना शिताफीने ताब्यात घेण्यात आले. दोन्ही आरोपींची कसून चौकशी केली असता घरफोडी केल्याची कबूली त्यांनी दिली.
शहर पोलिसांची मोठी कामगिरी
दरम्यान, त्यांच्याकडून चोरी केलेला १ लाख ८२ हजाराचा मुद्देमाल घरझडतीत हस्तगत करून जप्त करण्यात आला. ही कारवाई वरिष्ठांच्या सुचनेप्रमाणे उपविभागीय (Gondia Police) पोलीस अधिकारी श्रीमती रोहिणी बानकर, पोनि चंद्रकांत सुर्यवंशी यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकातील सपोनि सोमनाथ कदम, विजय गराड, पांढरे, पोउपनि मंगेश वानखेडे, पोहवा जागेश्वर उईके, सुदेश टेंभरे, कवलपाल भाटीया, निशिकांत लोंदासे, दिपक रहांगडाले, सतिश शेंडे, प्रमोद चव्हान, रिना चव्हान, अशोक रहांगडाले, दिनेश बिसेन, मुकेश रावते, सुभाष सोनवाणे यांनी केली आहे.
आरोपींना ४ जूनपर्यंत पोलिस कोठडी
मुर्री येथील (Gondia burglary) घरफोडी प्रकरणातील दोन अट्टल चोरट्यांना शहर पोलिसांनी जाळ्यात अडवून अटक केली. दरम्यान त्यांच्याकडून चोरी केलेला माल हस्तगत करून त्यांना न्यायालयात हजर केले. न्यायालयाने आरोपींना ४ जूनपर्यंत पोलिस कोठडी (Gondia Police) सुनावली आहे. दोन्ही चोरटे अट्टल गुन्हेगार असून त्यांच्याकडून आणखी चोरी, घरफोडीचे गुन्हे उघडकीस येणार का? याकडे लक्ष लागले आहे. पुढील तपास सपोनि सोमनाथ कदम करीत आहे.