गोंदिया (Gondia Crime) : सन २०१३ पासून माओवादी चळवळीत सक्रिय असलेल्या तसेच सालेकसा तालुक्यातील (Gondia Police) पोलिसांच्या चकमकीत सहभाग आणि शासनाकडून ७ लाखाचे बक्षिस असलेल्या जहाल नक्षलवाद्याने गोंदिया पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले. (Jahal Maoist ‘Bichhem) संजय उर्फ बीच्छेम सुकलू पूनेम (२५) रा.पुसनार, जि.बिजापूर (छग) असे आत्मसमर्पण केलेल्या माओवाद्याचे नाव आहे. या माओवाद्याने जिल्हाधिकारी प्रजित नायर, जिल्हा पोलिस अधिक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलिस अधिक्षक नित्यानंद झा यांच्या समक्ष नक्षल आत्मसमर्पण योजनेतंर्गत आत्मसमर्पण केले आहे.
७ लाखाचे होते बक्षिस
माओवादी चळवळीला प्रतिबंध व्हावा व अधिकाधिक माओवाद्यांनी आत्मसमर्पण करून विकासाच्या मुख्य प्रवाहात यावे, या उद्देशाने महाराष्ट्र शासनातर्फे नक्षल आत्मसमर्पण योजना राबविण्यात येत आहे. त्यातच (Gondia Police) गोंदिया जिल्हा पोलिस प्रशासनाकडून प्रभावी नक्षलविरोधी अभियानाची अंमलबजावणी केली जात आहे. यामुळे जंगल क्षेत्रातील नागरिक नक्षल्यांच्या भुलथापाना बळी न पडता विकासाच्या मुख्य प्रवाहात येऊ लागले आहेत. तर दुसरीकडे नक्षल चळवळ फक्त त्यातील पुढार्यांच्या स्वार्थासाठी राबविली जात आहे. या चळवळीत सहभाग करून घेतलेल्या युवक -युवतींचा फक्त वापर केला जातो. परिणामी नक्षल चळवळीत सक्रिय असलेले माओवादी विकासाच्या मुख्य प्रवाहापासून वंचित राहत आहेत. यामुळेच नक्षल चळवळीत सक्रिय असलेल्या (Jahal Maoist ‘Bichhem) संजय उर्फ बीच्छेम सुकलू पूनेम (२५) या माओवाद्याने गोंदिया जिल्हा प्रशासन व पोलिस प्रशासनापुढे आत्मसमर्पण केले आहे.
सन २०१३ पासून होता सक्रिय
छत्तीसगढ राज्यातील (Jahal Maoist ‘Bichhem) संजय उर्फ बीच्छेम सुकलू पूनेम (२५) हा ऑक्टोबर २०१३ मध्ये गांगलपुर दलम येथे भरती झाला. दरम्यान तो मॉड एरियामध्ये कंपनी क्र.७ व १० चे जहाल माओवादी पहाडसिंग याचा अंगरक्षक म्हणून काम करीत होता. त्यानंतर दर्रेकसा एरिया कमिटीच्या प्लाटून क्र.१ व चेतना नाट्यमंच मध्येही त्याने काम केले आहे. सन २०१७-१८ मध्ये सालेकसा येथे नक्षल चळवळीत सक्रिय असताना मुरकूडोह, टेकाटोला व (Gondia Police) चिचगड पोलिस ठाणेतंर्गत कोसबी जंगलात झालेल्या पोलिस-नक्षल चकमकीत त्याचा सहभाग होता.