गोरेगाव (Gondia crime) : गोरेगाव तालुक्यातील म्हसगाव येथे झोपेत असलेल्या इसमावर अज्ञात आरोपींनी धारदार शस्त्राने वार करून हत्या केली. ही घटना आज सकाळी उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली. ढिवरू इसान इरपाचे (५५) असे मृताचे नाव आहे. (Gondia crime) मृतक हा वृध्द आईसोबत घरी होता. तर पत्नी व मुले हे लग्न समारंभाकरीता बाहेर गेले होते. गाढ झोपेत असताना अज्ञात मारेकर्यांनी धारदार शस्त्राने डोके व गळ्यावर सपासप वार करून हत्या केली. सकाळी मृताची आई उठल्यावर ढिवरू हा अंथूरनावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसून आल्याने घटना उजेडात आली. घटनेची नोंद करून (Goregaon police) गोरेगाव पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.