सोशल मिडीयावरून ओढले प्रेमाच्या जाळ्यात
गोंदिया (Gondia Crime) : सोशल मिडीयाच्या माध्यमातून मैत्री जुळवून आरोपीने अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तसेच तिच्यावर वारंवार अत्याचार करून लैंगिक छळ (sexual harassment) केला. आरोपी एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने त्या अल्पवयीन मुलीचे काढलेले आक्षेपार्ह (viral video) व्हिडीओ व्हॉयरल केले. या संदर्भात फिर्यादीच्या तक्रारीवरून आरोपी दैनिक शेळके (२२) रा. सुंदरनगर गोंदिया याच्याविरूध्द गुन्हा (Gondia Crime) नोंद करून अटक करण्यात आली आहे.
माहितीनुसार, सोशल मिडीयाचा गैरवापर काही नविन गोष्ट नाही. यामाध्यमातून अनेक युवक-युवतींची फसवणूक केली जात आहे. यासाठी नवनविन प्रकार शोधले जातात. वाढत्या घटनांवरून सोशल मिडीयाचा वापर चिंतनाचा विषय ठरला आहे. असाच प्रकार गोंदिया शहरात उघडकीस आला आहे. गोंदियातील आपल्या आजीकडे लहानपणापासून राहणारी १७ वर्षाची पिडीत ही महिभाभरापूर्वी नागपूर येथे राहायला गेली. गोंदियात आपल्या आजीकडे असतांना त्या मुलीच्या आयडीवर आरोपी दैनिक शेळके (२२) रा. सुंदरनगर गोंदिया याने इंस्ट्राग्राम आयडीवर त्याने प्रâेंड रिक्वेस्ट पाठविली. त्याची प्रâेंड रिक्वेस्ट तिने स्विकारली.
त्या दोघांची इंस्टाग्रामवरच चांगलीच मैत्री झाली. पाहता-पाहता दोघांचे मैत्रीतून प्रेमात रूपांतर झाले. यातूनच त्या दोघांत शारीरीक संबध प्रस्तापीत झाले. त्याने त्या मुलीचे अनेकदा शारीरीक शोषण झाले. त्या दोघांची आक्षेपार्ह व्हीडीओ (viral video) काढून दैनिक शेळके याने युट्यूबवर प्रसारीत करून तिची बदनामी केली. या घटनेसंदर्भात (Gondia Police) गोंदिया शहर पोलिसात भादंविच्या कलम ३७६ (२) (एन) ३२३, ५०४, ५०६, सहकलम ४, ६, ८, १२ बाललैंगीक अत्याचार अधिनियमान्वये (Gondia Crime) गुन्हा दाखल केला आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गराड करीत आहेत.
व्हिडीओ व्हॉयरल अन् प्रकरण पोलिसात
आरोपी दैनिक शेळके याने त्या १७ वर्षाच्या मुलीला १ मार्च २०२४ ला संदुर नगरच्या चौकी येथे बोलावून सुंदरनगरातील लाल बंगल्यात घेऊन गेला. त्याने तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर अनेकदा त्याने तिच्यावर अत्याचार केला. त्यातच ५ जुलै २०२४ रोजी दैनिक शेळके याने तिला कुडवा परिसरातील डॉमीनोजच्या समोरील एका घरी तिला बोलाविले. त्या दोघांचे पैश्यावरून तिथे वाद झाला. यावरून आरोपीने तिला शिविगाळ करीत मारहाण केली. या वादातून संतापलेल्या दैनिक शेळके याने तिच्यासोबत आक्षेपार्ह काढून ठेवलेले व्हीडीओ व्हायरल (viral video) केले. आणि फिर्यादीने (Gondia Police) पोलिस ठाणे गाठून याची तक्रार केली. आणि घटनेचे बिंग फुटले.
बर्डी पोलिसांकडून गोंदिया शहर पोलिस ठाण्यात गुन्हा वर्ग
आरोपी दैनिक शेळके व अल्पवयीन मुलगी यांच्या मागील एक वर्षापासून प्रेम प्रकरण होते. या प्रेमप्रकरणातूनच लैंगीक शोषण झाले. या प्रकरणाला घेवून पिडीत मुलीने बर्डी पोलिस ठाणे गाठून आपबिती सांगितली. यानंतर (Gondia Police) पोलिसांनी गुन्हा नोंद करून (Gondia Crime) गुन्हा गोंदिया शहर पोलिसांकडे वर्ग केला. आरोपी दैनिक शेळके याला अटक करून पोलिसांनी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याची रवानगी तुरूंगात केली आहे.