अर्जुनी मोर (farmers incentive amount) : विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था जिल्हा संघ गोंदिया तसेच तालुका संघ अर्जुनी मोरगाव यांच्यामार्फत मा. विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था नागपूर विभाग यांना निवेदन देण्यात आले. गोंदिया जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकरी यांची बाकी असलेली (farmers incentive amount) प्रोत्साहन पर रासी ॲप सुरू करून गोंदिया जिल्ह्यातील जिल्ह्यातील उर्वरित 8810 शेतकऱ्यांना प्रोत्साहन राशी देण्यात यावी.
शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत प्रोत्साहन राशी पोहोचवणे हा हेतू बाळगून (Gondia district) गोंदिया जिल्ह्यामध्ये कुणीही प्रोत्साहन राशीपासून नियमीत कर्ज भरणारा शेतकरी वंचित राहू नये. यासाठी संघटनेच्या तर्फे सर्वतोपरी प्रयत्न केल्या जात आहेत. निवेदन स्वीकारताना स्वतः मा. विभागीय सहनिबंधक चंदेल सर तसेच मा. हर्षलजी काडीकर उपस्थित होते निवेदन संघटनेचे जिल्हाध्यक्ष डोमाजी बोपचे ,तालुका अध्यक्ष ललित बाळबुद्धे, संस्था अध्यक्ष प्यारेलाल जी गौतम तसेचअँड. पोमेशजी रामटेके सहकार मित्र, कायदेविषयक सल्लागार उपस्थित होते. (Paddy farmers) धान उत्पादक जिल्हे भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या चारही जिल्हातील शेतकऱ्यांची प्रोत्साहन राशी (farmers incentive amount) बाकी असल्याबाबत खूप विस्तृत चर्चा करण्यात आली आणि ते पूर्ण करण्यात यावी आणि पूर्ण होईल, असे चर्चेतून निष्पन्न झाले.