गोंदिया (Gondia Education) : बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण अधिनियमांतर्गत (आरटीई) (RTE Admission) आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना नामांकित इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये २५ टक्के जागा राखीव ठेवून प्रवेश दिला जातो. यंदा शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) प्रवेश प्रक्रियेत केलेल्या बदलांमुळे पालकांनी पाठ फिरवली आहे. शैक्षणिक वर्ष सन २०२४-२५ साठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेला सुरूवात झाली. त्यानुरूप (Gondia Education) जिल्ह्यातील २९९७ विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी ऑनलाईन नोंदणी केली होती. यातील २४४२ विद्यार्थ्यांचे अर्ज पात्र ठरले तर ३५५ विद्यार्थ्यांचे अर्ज अद्यापही प्रलंबित आहेत. विशेष म्हणजे ३१ मे ऑनलाईन नोंदणी करण्याची शेवटची तारीख असून यानंतर मुदतवाढ मिळणार नसल्याचे शिक्षण संचालकांनी पत्राव्दारे कळविले आहे.
आरटीई प्रवेश नोंदणी प्रक्रियेला दोन दिवस शिल्लक
आरटीईअंतर्गत वंचित, दुर्बल, सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास घटकांतील विद्यार्थ्यांना २५ टक्के राखीव जागांवर प्रवेश दिले जातात. (RTE Admission) प्रवेश प्रक्रियेतील बदलानंतर आरटीई प्रवेशांसाठी अर्ज नोंदणी प्रक्रिया १६ एप्रिलपासून सुरू करण्यात आली तर अर्ज भरण्यासाठीची अंतिम मुदत ३० एप्रिल होती. परंतु, आरटीई प्रवेश प्रक्रियेतून खासगी विनाअनुदानित शाळा, विशेषतः इंग्रजी शाळा वगळण्यात आल्याने पालकांनी प्रवेश प्रक्रियेकडे पाठ फिरवली आहे. तर ज्या उद्देशाने आरटीई सुरू करण्यात आली, त्याच उद्देशाला या नवीन बदलामुळे हरताळ फासल्या जात असल्याचा आरोप पालकांकडून करण्यात आला होता. या संदर्भात न्यायालयात धाव घेण्यात आली. यामुळे न्यायालयाने प्रवेश प्रक्रियेवर बंदी आणून जुन्या निकषानुसारच नोंदणी करण्यात यावे, अशा सुचना केल्या होत्या. त्यानुरून पुन्हा १७ मे पुन्हा ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला सुरूवात करण्यात आली. गोंदिया जिल्ह्यात आरटीई व शिक्षण विभागाच्या ढिसाळ कारभाराने पालक अनुत्सूक दिसून आले. आतापर्यंत जिल्ह्यात २९९७ विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी ऑनलाईन नोंदणी केली होती. यातील २४४२ विद्यार्थ्यांचे अर्ज पात्र ठरले तर ३५५ विद्यार्थ्यांचे अर्ज अद्यापही प्रलंबित आहेत. प्रवेश प्रक्रियेला शेवटचे दोन उरले असून ३१ मे अंतिम तारीख आहे. यानंतर प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात येणार नाही, असे शिक्षण संचालक (प्राथमिक) यांनी प्रसिध्दी पत्रकातून कळविले आहे.
नविन बदल आणि माहितीचा अभाव
शालेय शिक्षण विभागाने आरटीई (RTE Admission) प्रवेश प्रक्रियेत केलेल्या बदलानुसार विद्यार्थ्यांच्या निवासस्थानापासून एक किलोमीटरपर्यंतच्या अनुदानित शाळा, शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेत प्रवेश देण्यात येणार आहेत. यातील उपलब्ध शाळा नसल्यासच स्वयंअर्थसाहाय्यित खासगी शाळेत प्रवेश दिला जाणार आहे. (Gondia Education) शाळा निवडताना पालकांना अनुदानित शाळा, शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळा आणि त्यानंतर स्वयंंअर्थसाहाय्यित शाळा या प्राधान्यक्रमानुसार प्रवेश दिला जाणार होता. परंतु, पालकांनी यावर आक्षेप घेत न्यायालयात दाद मागितली. त्यामुळे न्यायालयाने बंदी आणून जुन्या निकषानुसारच प्रवेश प्रक्रिया राबविण्याचे निर्देश दिले. परंतु, शिक्षण विभागाकडून या संदर्भात जनजागृती करण्यात आली नाही. तसेच पालकांच्या समस्येचे निराकरण करण्यातही विभाग अपयशी ठरल्याने आरटीई प्रक्रियेला फटका बसणार आहे.
तालुकानिहाय स्थिती
शैक्षणिक सत्र २०२४-२५ साठी (RTE Admission) आरटीई ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील २९९७ विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी ऑनलाईन नोंदणी केली. यातील २४४२ विद्यार्थ्यांचे अर्ज पात्र ठरले तर ३५५ विद्यार्थ्यांचे अर्ज अद्यापही प्रलंबित आहेत. यामध्ये अर्जुनी मोरगाव तालुक्यात अर्जुनी-मोर तालुक्यातील ८८ विद्यार्थ्यांनी अर्ज केले. यातील १८ प्रलंबित असून ७० अर्ज पात्र ठरले. (Gondia Education) आमगाव ३३९ पैकी ३७ प्रलंबित ३०२ पात्र, देवरी ७८ पैकी १० प्रलंबित ६६ पात्र, गोंदिया १४१३ पैकी १८५ प्रलंबित १२२८ पात्र, गोरेगाव २४९ पैकी ३० प्रलंबित २१९ पात्र, सालेकसा ८६ पैकी १५ प्रलंबित ७१ पात्र, सडक अर्जुनी १०५ पैकी १४ प्रलंबित ९१ पात्र व तिरोडा तालुक्यातील ४३९ पैकी ४६ प्रलंबित तर ३९३ विद्यार्थ्यांचे अर्ज पात्र ठरले आहेत.
०००००