विज पडून म्हैस ठार
अर्जुनी मोरगाव/ गोंदिया (Heavy Rain) : तालुक्यातील खांबी/पिंपळगाव येथे विज पडल्याने म्हेस जागीच ठार (kills buffalo) झाली. ही घटना १४ जुलैच्या सायंकाळी ७ वाजता सुमारासची आहे. या घटनेत पशुपालक शेतकरी हेमराज नानु मेश्राम यांचे नुकसान झाले आहे. खांबी/पिंपळगाव परिसरात अचानक वातावरणात बदल होवून पावसाला सुरूवात झाली. विजेच्या कडकडाट असतानाच पशुपालक शेतकरी हेमराज नानु मेश्राम यांच्या अंगणात बांधलेल्या म्हशीवर विज पडल्याने जागीच ठार झाली. या (Heavy rain) घटनेत पशुपालकाचे १ लाखाचे नुकसान झाले असून शासनाने पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी परिसरातून केली जात आहे.
नाल्याला पुर; महागाव-शिरोली रस्ता बंद
काल, तालुक्याला पावसाने झोडपून काढले. मुसळधार पावसाने परिसरात पाणीच पाणी अशी परिस्थिती काही काळ निर्माण झाली होती. दरम्यान महागाव ते मोरगाव मार्गावरील शिरोली जवळ असलेल्या नाल्याला पुर (Flooding drains) आल्याने रस्ता बंद पडला होता. त्यामुळे शेतकरी, विद्यार्थी व नागरिकांची चांगलीच कोंडी झाली. रहदारी ठप्प पडल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते.
अर्जुनी मोरगाव तालुक्यात काल पावसाने हजेरी लावली. (Heavy rain) दमदार पावसाने झोडपून काढल्याने नागरिकांची एकच दाणादाण उडाली. दरम्यान पावसाच्या प्रतिक्षेत असलेल्या शेतकर्यांना दिलासा मिळाला तर सर्वसामान्य सुखावला. मुसळधार पावसाने महागाव ते मोरगाव अर्जुनी मार्गावर शिरोली गावशिवारातून वाहत असलेल्या नाल्याला पुर आल्याने वाहतूक ठप्प पडली. शिरोली व महागाव या गावांचे संपर्क काही काळ तुटले होते. रहदारी बाधित झाल्याने शेतकरी, नागरिक व विद्यार्थ्यांची कोंडी झाली होती. पुर ओसरताच वाहतूक पुर्ववत झाली. परंतु, यादरम्यान परिसरातील जनजीवन विस्कळीत झाल्याचे दिसून आले.
पिकांचे नुकसान
अचानक पावसाने झोडपून काढल्याने नाल्याला पुर आला. दरम्यान पुराचे पाणी परिसरातील शेतात शिरल्याने शेकडो शेतकर्यांना चांगलाच फटका बसला. (Heavy rain) मुसळधार पाऊस आणि पुराच्या पाण्याने शेत जमिनीला वेढा घातला. यामुळे पिक पाण्यात सापडली. यामुळे शेतकर्यांचे नुकसान झाले असून पंचनामा करून भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकर्यांकडून केली जात आहे.