गोंदिया-अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील केशोरी-चिचोली मार्गावरील पर्यायी रस्ता पुन्हा वाहुन गेला
गोंदिया (Gondia heavy rain) : जिल्ह्यात 19 जुलै पासून पावसाने तालुक्यात सर्वत्र दमदार (heavy rain) हजेरी लावली आहे.त्यामुळे अर्जुनी/मोरगाव तालुक्यात अतिवृष्टी झाली याचा फटका जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या अतिदुर्गम अर्जुनी/मोरगाव तालुक्याला बसला यात केशोरी-चिचोली या दोन्ही गावाला जोडणाऱ्या पुलाचा मागील तीन महिन्यापासून बांधकाम सुरु आहे. या साठी पुलाच्या बाजूला पर्यायी रस्ता तयार करण्यात आला होता मात्र आलेल्या मुसळधार पावसाने पर्यायी रस्ता पुराच्या पाण्याने आता पर्यंत तिनदा वाहुन गेल्याने रस्ता बंद झाल्यामुळे याचा फटका शेतकऱ्यांसह शाळेचे विद्यार्थी व ये-जा करणाऱ्या सर्व सामान्य नागरिकांना बसला आहे.
तर दुसरीकडे सध्या खरीपाचा हंगाम सुरु असुन धान पिकाच्या रोवणीचे कामे सुरु असल्याने शेतकरी देखिल आपल्या शेतात तसेच शाळेतील विद्यार्थी शाळेत जाऊ शकले नाही. तर गोठणगाव येथील इटीयाडोह धरण परिसरात पाऊस (heavy rain) पडत असल्याने धरण 24 जुलै ओव्हरफ्लो झाला होता आणि 26 जुलै रोजी जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी धरणाचे शासकीय जलपुजन केले होते. मात्र पाऊस सुरुच असल्यामुळे धरणाच्या सांडव्यावरुन सव्वा दोन फुट ईतका पाण्याचा विसर्ग सुरु असुन गाढवी नदी ओसंडुन वाहत आहे.यामुळे शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेली असुन केशोरी येथील स्मशान भुमीचे शेड शुद्धा पाण्याखाली गेले आहेत.
तर मुसळधार पावसामुळे (heavy rain) केशोरी-चिचोली आणि केशोरी-वडेगाव/बंध्या मार्गे वडसा मार्ग गाढवी नदीच्या पुलावरुन 2 फुट पाणी वाहत असल्याने वडेगाव-खोळदा गावाचा संपर्क तुटला आहे. त्यामुळे वरील दोन्ही रस्त्यावर पोलीस बंदोबस्त लावला असुन रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. कुणीही आपला जीव धोक्यात घालुन रस्ता ओलांडुन जाऊ नये अशा सुचना केशोरीचे पोलीस स्टेशनचे ठाणेदार पोलीस निरीक्षक गणेश वनारे यांनी नागरिकांना दिल्या आहेत.