गोंदिया (Gondia Heavy Rain) : जिल्ह्यात उन्हाच्या तीव्र झळा (Heat Wave) आणि ४२ अंशावर स्थिरावलेल्या तापमानामुळे नागरिकांना मान्सूनची प्रतिक्षा लागली होती. त्यातच काल (ता.७) पासून मृग नक्षत्राला सुरूवात झाली. त्यामुळे पावसाची प्रतिक्षा कायम असतानाच सायंकाळी (Heavy Rain) वादळासह पावसाने हजेरी लावली. सुसाट वारा आणि पावसाने जवळपास दोन तास झोडपून काढल्याने अनेक झाडे कोसळली तर विज वाहिन्यांचे तार तुटली. वादळाचा घर, गोठ्यांना तडाखा बसल्याने नुकसान झाले. एंकदरीत वादळासह आलेल्या पावसाने गोंदियाकरांची तारांबळ उडाली होती.
झाडे कोसळली, जिल्ह्यात तारांबळ उडाली
जिल्ह्याचे तापमान ४२ अंशावर स्थिरावले आहे. उन्हाच्या तीव्र झळा आणि उकाड्याने गोंदिया जिल्हावासी हैराण झाले आहेत. त्यामुळे (Heavy Rain) मान्सूनचे आगमन होऊन पाऊस केव्हा येणार, याची प्रतिक्षा सुरू आहे. त्यातच कालपासून मृग नक्षत्राला सुरूवात झाली. मृग नक्षत्रात जिल्ह्यात पाऊस हजेरी लावणार, असा अंदाज होता. परंतु, मागील दोन ते तीन दिवसांपासून तापमान आणि वातावरण लक्षात घेता पावसाची चिन्हे दिसून येत नव्हती. काल (ता.७) सायंकाळ होताच अचानक वातावरणात बदल होऊन आकाशात ढग दाटून आले. एवढेच नव्हेतर सुसाट वारा सुरू झाला. दरम्यान वेगवान वार्याने गोंदिया शहरासह जिल्ह्यातील अनेक भागात चांगलाच तांडव घातला. विजेच्या कडकडाटासह रात्री ७.३० वाजता सुमारास पावसाला सुरवात झाली. दरम्यान सुसाट वारा व (Heavy Rain) पावसाने तब्बल दोन झोडपून काढले. यामुळे नागरिकांची एकच ताराबळ उडाली. वादळाने अनेक वृक्ष कोलमडून पडली. विज वाहिन्यांची तारे तुटली तर नागरिकांचे घराचे छत, टिनाचे पत्रे, सोलर पॅनलसाठी उभारण्यात आलेले शेड वादळात सापडल्याने मोठे नुकसान झाले. आज दिवसभर संबधित विभागाचे कर्मचारी आणि नागरिक कालच्या वादळाने झालेली नासधूस दुरूस्त करताना दिसून आले. एंकदरीत वादळाने गोंदियाकरांची तारांबळ उडाली होती.
वादळाने ‘महावितरण’ क्लीन बोल्ड
काल सायंकाळी गोंदिया शहराला पावसासह आलेल्या वादळाचा चांगलाच तडाखा बसला. शहरातील अनेक भागात (Heavy Rain) वादळाने तांडव घातल्याने नासधूस झाली. वादळाने अनेक वृक्ष कोलमडून पडले. यामुळे विज वाहिन्यांचे तारे तुटून विज पुरवठा खंडीत झाला होता. सायंकाळी ७ वाजता खंडीत झालेला विज पुरवठा मध्यरात्रीपर्यंत सुरळीत झाला. तर अनेक भाग अंधारातच राहिली. यामुळे महावितरणच्या (Heavy Rain) मान्सून पुर्व कामांची पोलखोल झाली असून पहिल्याच पावसाने महावितरण क्लीन बोल्ड झाल्याची चर्चा शहरात सुरू होती.