– अरविंद राऊत
गोंदिया (Gondia municipal council) : शहराला लागून असलेल्या छोटा (Gondia municipal) गोंदिया व गोंविदपूर येथील देवबोळीतील घाण नागरिकांच्या जीवावर उठली आहे. अस्वच्छता, घाण पाणी आणि निर्माण झालेले वातावरणात नागरिकांना राहणे कठीण होऊन बसले आहे. असे असले तरी नगर परिषद लक्ष देण्यास तयार नसल्याने नागरिक आक्रोश व्यक्त करीत आहेत. विशेष म्हणजे, दोन दिवसांपूर्वी घाण पाण्याने बोळीतील हजारो (Dead fish) मासोळ्या मृत्यूमुखी पडल्या असून उपाययोजना करण्यात न आल्याने त्या मासोळ्या बोडीतून कुंजलेल्या स्थितीत आल्या आहेत. यामुळे दुर्गंधीत आणखी वाढ झाली असून नागरिकांना तोंड-नाकावर कापड बांधूनच रहावे लागत आहे.
परिसरातील नागरिकांच्या तोंडाला कापड
छोटा (Gondia municipal) गोंदिया-गोंविदपूर परिसरात शहराचा शेवटचा परिसर आहे. या ठिकाणी वर्षांनुवर्षापासून बोडी (तलाव) आहे. या तलावाकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने आजघडीला नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. असे असतानाच परिसरातील घाणपाणी व कचरा देवबोळी परिसरात साचून राहतो. वर्षांनुवर्षापासून हा प्रकार सुरू आहे. शिवाय स्वच्छतेकडे पालिकेने कधी लक्ष दिले नाही. यामुळे आजघडीला ही देवबोडी छोटा (Gondia municipal) गोंदिया व गोंविदपूर वासीयांच्या जीवावर उठली आहे. येथील रहिवासी पाण्याच्या दुर्गंधीने त्रस्त झाले आहेत. तोंड-नाकाला कापड बांधण्याशिवाय राहणे अशक्य आहे. अशा वातावरणातही नागरिक दिवस काढत आहेत.
अस्वच्छ व विषारी पाण्याने हजारो मासोळ्या मृत्यूमुखी
असे असतानाही परिसरातील जनप्रतिनिधी आणि (Gondia municipal) नगर परिषद प्रशासन या गंभीर प्रशासनाकडे लक्ष देण्यास तयार नाही. यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून श्वसनाचे आजार उद्भवत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे, मागील तीन दिवसांपूर्वी अस्वच्छ व विषारी पाण्याने बोडीतील हजारो (Dead fish) मासोळ्या मृत्यूमुखी पडल्या. त्या मासोळ्या कोणत्या कारणाने मृत्यूमुखी पडल्या, याचा शोध घेण्याचे साधे प्रशासनाला सुचले नाही. यामुळे ही अस्वच्छता नागरिकांच्या जीवावर उठणार तेव्हा प्रशासनाला जाग येणार का? असा प्रश्न संतप्त नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. मृत मासोळ्या कुंजल्याने आणखी दुर्गंधी वाढली असून संपूर्ण परिसर दुर्गंधीयुक्त झाला आहे. त्यामुळे प्रशासन केव्हा जागा होणार? याकडे छोटा गोंदिया (municipal council) व गोंविदपूर वासीयांचे लक्ष लागले आहे.
नागरिकांचे वास्तव्य करणे कठीण
देवबोडीतील घाण, दुषित पाण्याने परिसरात दुर्गंधीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच (Dead fish) मासोळ्या मृत्यूमुखी पडल्याने बोडीतील पाणी विषारी झाल्याचे समजून येत आहे. यामुळे प्रशासनाकडून उपाययोजना करण्याची अपेक्षा परिसरातील नागरिकांना होती. परंतु, अद्यापही दखल घेतली गेली नसल्याने मोठ्या संकटाला निमंत्रण दिले जात आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दुर्गंधीने श्वास घेणेही कठीण झाले असून येथील नागरिकांना नाक-तोेंडाला कापड बांधून रहावे लागत आहे. यामुळे श्वसनाचे आजाराचा विस्फोट होऊन आरोग्याचे मोठे संकट निर्माण होणार, अशी भिती नागरिकांना होत आहे.
३.५ एकरातील तलाव धोक्यात
देवतलाव (देवबोळी) नावाने ओळख असलेला ही बोडी जवळपास ३.५ एकरात पसरलेली आहे. कित्येक वर्षांपासून बोडीचे अस्तित्व कायम होते. परंतु, वाढते अतिक्रमणाने बोडी नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. त्यातच परिसरात सांडपाणी विल्हेवाट लावण्यासाठी नियोजनबध्द व्यवस्था नसल्याने या बोडीत परिसरातील सांडपाणी साचत आहे. (Gondia municipal) नगर परिषदेला विसर पडल्याने बोडी लोप पावत आहे. तर दुसरीकडे सौंदर्यीकरण करून कायाकल्प केल्यास परिसराच्या सौंदर्यात भर पडणार, यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांचा लढा सुरू आहे. पण प्रशासन मात्र डोळे मिटून मुकदर्शक झाला आहे.