गोंदिया (Gondia Murder Case ) : शहरात गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी (Gondia Police) पोलिस कसोसीचे प्रयत्न करीत असले तरी पोलिसांना न जुमानता गुन्हेगारी वाढत आहे. याचे प्रत्यय आठवडा लोटला नाही घडणार्या घटनांवरुन येत आहे. काही दिवसांपूर्वी छोटा गोंदिया येथे एका युवकाची हत्या करण्यात आली. या (Gondia Murder Case) घटनेची शाई सुकली नाही की, कुंभारे नगर येथील आंबेडकर भवनाजवळ १७ वर्षीय युवकाची धारदार शस्त्र व दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. ही घटना काल (ता.१८) रात्री ९.३० वाजता सुमारासची आहे. उज्ज्वल उर्फ दद्दू निशांत मेश्राम रा.भिमनगर असे मृताचे नाव आहे.
कुंभारेनगर येथील घटना
गोंदिया शहराला गुन्हेगारीचे स्वरूप येऊ लागले आहे. जानेवारी ते २० जूनपर्यंत एकूण ७ खुन तर ५ घटनात खुनाचा प्रयत्न झाला आहे. अलीकडे (Gondia Police) गोंदिया पोलिस गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी अॅक्शन मोडवर आली असली तरी गोंदिया शहरातील गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक खाकी वर्दीतील पोलिस तसेच त्यांच्या कारवाईला जुमानत नसल्याचे समोर येऊ लागले आहे. एका घटनेची शाई सुकली नाही की दुसरी घटना समोर येत असल्याने गोंदिया शहरात चाललेय काय? असा सवाल उपस्थित केला जात आहे. भिमनगर येथील दद्दू उर्फ उज्ज्वल मेश्राम हा काल रात्री जेवणानंतर परिसरात फेरफटका मारत होता. दरम्यान दोन युवकांनी त्याला बोलावून कुंभारेनगर येथील आंबेडकर भवनाजवळ नेले. त्या ठिकाणी त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला (Gondia Murder Case) चढविला. उज्ज्वल रक्ताच्या थारोळ्यात खाली पडताच त्याला दगडाने ठेचण्यात आले. या घटनेनंतर आरोपींनी पळ काढले. या घटनेची माहिती मिळताच भिमनगर, आंबेडकर वॉर्ड परिसरात एकच खळबळ उडाली. उज्ज्वलचे कुटूंब घटनास्थळी दाखल झाले असता त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याचे समोर आले. यामुळे (Gondia Police) गोंदिया पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून तपासकार्याला सुरूवात केली. या प्रकरणात दोन आरोपी असून त्यातील एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. तर एक आरोपी फरार असल्याचे सांगण्यात आले.
अवघ्या काही तासातच हत्येचा उलगडा
काल, कुंभारेनगर परिसरात उज्ज्वल निशांत मेश्राम याची निघृण हत्या झाली. या (Gondia Murder Case) घटनेची शहर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तुर्त आरोपींना जेरबंद करण्यासाठी तपासकार्य हाती घेतले. स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि लबडे व (Gondia Police) गोंदिया शहर पोलिस ठाण्याचे पोनि चंद्रकांत सुर्यवंशी यांच्या नेतृत्वात दोन पथक आरोपींच्या शोधात रवाना करण्यात आले. घटनास्थळावरील भौतिक पुरावे व प्रत्यक्षदर्शींच्या माहितीवरून त्याचप्रमाणे गोपनिय माहितीच्या आधारावर आरोपी अंकित घनश्याम गुर्वे (२२) रा.सिंगलटोली गोंदिया याला ताब्यात घेण्यात आले. दरम्यान आरोपीने जुन्या वैमनस्यातून अंकितची हत्या केल्याची कबूली दिली. त्याचप्रमाणे या घटनेत आणखी एक आरोपी असल्याचे त्याने सांगितले. मात्र दुसरा आरोपी राहुल प्रशांत शेंडे रा.सिंगलटोली हा फरार असल्याचे सांगण्यात आले आहे.
आर्थिक देवाणघेवाणातून काढला वचपा
उपविभागीय पोलिस अधिकारी रोहिणी बानकर यांनी घटनेची माहिती देण्यासाठी आज (ता.१९) माध्यमांशी संवाद साधला. दरम्यान त्यांनी सांगितले की, आरोपी गुर्वे हा रेल्वेमध्ये वेंडरचा काम करतो. काही दिवसांपूर्वी आर्थिक देवाणघेवाण वरून गुर्वेच्या वडिलासोबत मृतकाचे भांडण झाले होते. दरम्यान त्याने गुर्वेच्या वडिलाला मारहाण केली होती. त्या घटनेचा वचपा काढण्यासाठी उज्ज्वलची हत्या केल्याची कबूली दिली आहे. पुढील तपास सुरू असून आणखी काही बाबी उघडकीस येतील, असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पोलिसांकडून दिशाभूल; मृताच्या आई-वडीलांचा आरोप
११ जानेवारी २०२४ रोजी नगरसेवक लोकेश (कल्लु ) यादव यांच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणाशी आपल्या मुलाच्या हत्येचे सुत्र जुळले आहेत. (Gondia Murder Case) गोळीबार प्रकरणात प्रशांत मेश्राम हा आरोपी आहे. त्याच्याशी नातेसंबध असणे, आमचा मोठा गुन्हा आहे. फरार आरोपी प्रशांत मेश्राम याला शोधण्यात अपयश आलेल्या (Gondia Police) पोलिसांनी गेल्या पाच महिन्यांपासून आपल्या मुलाला छळ केला. सतत पोलिस ठाण्यात बोलावून मारहाण करण्यात आली. एवढेच नव्हेतर यादव कुटूंबियाकडून देखील सातत्याने धमक्या मिळायच्या. त्यामुळे माझ्या मुलाचा जीव धोक्यात आहे, असे सपोनि गरडकर व कदम यांना वारंवार सांगितले. मात्र हे दोन्ही अधिकारी उलट आम्हाला दमदाटी द्यायचे. अखेर काल माझ्या मुलाची हत्या करण्यात आली. या हत्येमागे ११ जानेवारीला घडलेल्या प्रकरणाची सुत जुळले आहे. त्या अनुसंगाने संशयित आरोपी म्हणून यादव कुटूंबातील दोघांसह चार जणांचे नाव तक्रारीत दाखल केले आहे. परंतु, (Gondia Police) पोलिस जुने भांडण व देवाणघेवाणातून हत्या झाल्याचे सांगून दिशाभूल करीत आहे. असा आरोप मृतक उज्ज्वल ची आई मंजु मेश्राम व वडिल निशांत मेश्राम यांनी केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून खर्या आरोपींना अटक करण्यात यावी, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.