गोंदिया (Gondia Murder Case) : शहरात गुन्हेगारी थांबता थांबेना…(Gondia Police) पोलिसांच्या कारवाईला गुन्हेगार जुमानेना…युवक गुन्हेगारीच्या पथ्यावर या सर्व प्रकाराची अनुभूती येऊ लागली आहे. एका घटनेची शाई सुकली नाही की, दुसरी घटना समोर येत आहे. काल (ता.२३) रात्री ११ वाजता सुमारास जितेश चौकात हत्येचा थरार (Murder Case) अनुभवास आला. क्षुल्लक वादावरून एका तरूणाने मित्राची चाकूने भोसकून हत्या केली. या घटनेमुळे पुन्हा गोंदिया शहरातील गुन्हेगारी आणि (Gondia Police) पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्न निर्माण झाले आहे. राहुल दिलिप बिसेन (२२) रा.छोटा गोंदिया असे मृताचे तर प्रतिक उर्फ सोनू राजेंद्र भोयर (२३) रा.जितेश चौक असे आरोपीचे नाव आहे. या प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात आली आहे.
गोंविदपूरच्या जितेश चौकात हत्येचा थरार
पोलिस (Gondia Police) सुत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार छोटा गोंदिया येथील जितेश चौकात राहुल बिसेन व प्रतिक भोयर हे दोघे एकाच ठिकाणी बसून होते. दरम्यान दोघांमध्ये क्षुल्लक कारणावरून भांडण सुरू झाले. या दोघांमधील वाद विकोपाला गेला आणि प्रतिक भोयर याने रागाच्या भरात राहुल बिसेन याच्यावर चाकूने सपासप वार केले. या घटनेत राहुल बिसेन याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या (Murder Case) घटनेची पसरताच जितेश चौकात एकच खळबळ उडाली. फिर्यादी दिलीप जीवनलाल बिसेन याच्या तक्रारीवरून गोंदिया शहर पोलिस ठाण्यात कलम ३०२ भादंवि अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तर दुसरीकडे हत्येला पूर्णरूप दिल्यानंतर आरोपीने प्रतिक याने घटनास्थळावरून पळ काढले. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत जिल्हा पोलिस अधिक्षक पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली (Gondia Police) पोलिस आरोपीचा शोधकामी लागले. दरम्यान अवघ्या काही तासातच पोलिस पथकाने आरोपी प्रतिक राजेंद्र भोयर याला अटक करण्यात यश मिळविले. या (Gondia Murder Case) प्रकरणाचे पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी रोहिणी बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि मंगेश वानखेडे करीत आहेत.