अर्जुनी/मोरगाव(Gondia) :- दि.29 डिसेंबर 2024 रोजी गुरुवार ला हॉकी खेळाचे जादुगर मेजर ध्यानचंद यांच्या जयंती निमित्त राष्ट्रीय क्रीडा दिनाचे (National Sports Day) औचित्य साधुन क्रीडा संकुल अर्जुनी/ मोरगाव येथील पटांगणात सुरभी स्पोर्टींग क्लब तर्फे क्रीडा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
सर्व प्रथम हॉकीचे जादुगर मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पुजन अर्जुनी/मोरगावचे उपविभागीय अधिकारी वरूनकुमार सहारे यांच्या हस्ते करण्यात आले. तर एम.के. पालीवाल, सामाजिक कार्यकर्ता दिवाकर चुटे, एम.आर.वनवे, ए.डी.कांबळे, एस.एस.पंधरे, श्री.पुस्तोडे, रामटेके, वाघाडे तसेच खेळाडु यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला. याप्रसंगी उपविभागीय अधिकारी वरूनकुमार सहारे यांनी राष्ट्रीय क्रीडा दिना निमित्त सर्व खेळाडूंना मार्गदर्शन करुन शुभेच्छा दिल्यात. यावेळी सुरभी स्पोर्टींग क्लब तर्फे सर्व खेळाडुंना गणवेश किटचे वाटप करण्यात आले.