Gondia:- दिनांक 17/8/2024 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार (NCP Sharad Pawar) पक्ष तालुका अर्जुनी मोरगाव तालुक्यातील बुथ प्रमुखांची आढावा बैठक क्रृषी उत्पन्न बाजार समिती (Agricultural Produce Market Committee) बाजार समिती अर्जुनी मोरगाव येथे घेण्यात आली, बैठकीला अध्यक्ष म्हणून मा . श्री.यशवंत परशुरामकर सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती अर्जुनी मोरगाव तथा प्रदेश सचिव राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष होते.
घराघरात आपल्या पक्षाची ध्येय धोरणे पोहचवा
प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा अध्यक्ष मा. सौरभ रोकडे, गोंदिया विधानसभा मतदारसंघ प्रमुख, मा.शेखर चामट, अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष अध्यक्ष इरफान पठाण, सौ.निता साखरे माजी जिल्हा परिषद सदस्या, तसेच तालुका अध्यक्ष सुरेश खोब्रागडे, तालुका महीला अध्यक्ष शुभांगी राखडे, तालुक्यातील पदाधिकारी व बुथ प्रमुख उपस्थित होते. सर्व बुथ प्रमुखांना पक्ष वाढीसाठी प्रत्येक गावात बुथ कमेटी स्थापण करून जनसंपर्क वाढविण्यासाठी जोमाने कामाला लागावे व घराघरात आपल्या पक्षाची ध्येय धोरणे पोहचवा. येणाऱ्या निवडणुकीत आपल्या पक्षाचे उमेदवार निवडून आणण्यासाठी सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी सक्रिय कार्य करावे असे आवाहन उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शनातून केले.