पोलिस यंत्रणा अलर्ट, मनसुबा उधळला
गोंदिया (Gondia Police system) : विधानसभा निवडणूक शांततेत पार पडावी, या अनुसंगाने पोलिस यंत्रणा सज्ज झाली आहे. नक्षल प्रभावित क्षेत्रामध्ये सर्च ऑपरेशन राबविले जात आहे. गोपनिय माहितीच्या आधारावर राबविण्यात आलेल्या सर्च ऑपरेशन दरम्यान टाकेझरीच्या जंगलात नक्षल्यांचे आक्षेपार्ह साहित्य पोलिसांच्या हाती लागले. या कारवाईमुळे नक्षल्यांचा घातपात करण्याचा मनसुबा उघडकीस आला आहे. साहित्यामध्ये इलेक्ट्रीक वॉयर, कॉन्डेक्स, युरिया सारखे रासायनिक पदार्थ, बॅटरी, कुकर, झिलेटिंग कांड्या, पॉकिग टेप, लोखंडी खिळे, नोकदार लोखंड, काचेचे तुकडे या साहित्याचा समावेश आहे.
विधानसभा निवडणूक शांततेत पार पडावी, या अनुसंंगाने (Gondia Police) पोलिस यंत्रणा अलर्टवर आहे. सी-६० पथक, सशस्त्र दूरक्षेत्र, नक्षल प्रभावित भागात सर्च मोहिम राबविण्यात येत आहे. अतिरिक्त पोलिस अधिक्षक नित्यानंद झा यांना टाकेझरी जंगलात नक्षल्यांनी काही साहित्य लपवून ठेवल्याची विश्वसनिय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारावर २४ ऑक्टोबर रोजी पहाटेच्या सुमारास टाकेझरी जंगलात सर्च ऑपरेशन राबविण्यात आले.
दरम्यान श्वान पथक, बॉम्बरोधक पथकाच्या माध्यमातून तपासणी करण्यात आली असता एका दगडाच्या खाली ताडपत्रीमध्ये नक्षल्यांनी लपविलेले आक्षेपार्ह साहित्य लपविले. यामध्ये इलेक्ट्रीक वॉयरचे चार बंडल, १८ फुट कॉन्डेक्स, २ किलो युरियासारखे रासायनिक पदार्थ, सेमी सॉलिड बॅटरी, कुकर, ३ झिलेटिंग कांड्या, ३ प्लग, इलेक्ट्रीक डेटोनेटर, पॅकिंग टेप पट्टी, १३० नग लहानमोठे नोकदार लांबीचे खिळे व १९० नग काचेचे तुकडे या साहित्याचा समावेश आहे. या (Gondia Police) प्रकारामुळे नक्षल्यांचा मनसुबा उघडकीस आला आहे.