तिरोडा/ गोंदिया (Gondia Police) : राज्य शासनाकडून पोलिस विभागातील (police department) बदल्यांना घेवून सकारात्मक प्रतिसाद दिसून येत नाही. यामुळे जिल्ह्यातील पोलिस अधिकारी, कर्मचार्यांच्या बदल्या रखडल्या आहेत. याला शासनाची दिरंगाई कारणीभूत आहे. परंतु, (police transfer) बदली प्रक्रियेतील दिरंगाईने पोलिस अधिकारी, कर्मचार्यांना पाल्यांच्या शैक्षणिक भवितव्याची चिंता सतावत आहे. निकाल जाहिर होऊन बराच वेळ लोटला आहे. सर्वत्र प्रवेशासाठी लगबग सुरू आहे. परंतु, पोलिस अधिकारी, कर्मचारी संभ्रमात सापडले आहेत.
मुलांचे शैक्षणिक नुकसानीची भिती
पोलिस अधिकारी, कर्मचार्यांच्या बदल्यांचा (police transfer) मुहूर्त केव्हा काढण्यात येणार, हे शासन दरबारी गुलदस्त्यात दडले आहे. (police department) पोलिस विभागातील बदल्यांना घेवून शासनाकडून अद्यापही सकारात्मक पाऊस टाकण्यात आले नाही. त्यामुळे जिल्ह्यातील पोलिस अधिकारी, कर्मचार्यांच्या बदल्या रखडल्या आहेत. तर दुसरीक दहावी व बारावीसह अनेक परिक्षांचा निकाल जाहिर होऊन बराच अवधी लोटला आहे. निकाल लागल्यापासूनच प्रवेशासाठी सर्वत्र लगबग सुरू झाली आहे. कागदपत्रांची जुळवाजुळव करून पाल्यांसह पालक नामांकित महाविद्यालयात प्रवेश मिळावा, यासाठी धडपड करीत आहेत. परंतु, या सर्व प्रकारातून पोलिस अधिकारी, कर्मचार्यांची मुले बाहेर आहेत.
पाल्यांच्या शिक्षणाला घेवून पोलिसांमध्ये चिंता
शासनाकडून पोलिसांच्या बदल्यांमध्ये (police transfer) दिरंगाई केली जात असल्याने संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. अॅडमिशन करावे अथवा करू नये, अशा दुहेरी विवंचनेत पोलिसांचे पाल्य सापडले आहेत. अॅडमिशन केल्यावर आपल्या वडिलाची दुसर्या ठिकाणी स्थानांतरण झाले तर काय करणार? अशा अनेक प्रश्नांच्या भडीमारात पोलिसांचे पाल्य दिवस काढत आहेत. या सर्व प्रकाराने शैक्षणिक संकटाला समोर जाण्याची वेळ पोलिसांच्या पाल्यांवर येणार आहे. तर दुसरीकडे आपल्या मुलांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात येणार? या चिंतामुळे पोलिस अधिकारी, कर्मचारी तणावात आहेत. शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शासनाने पाऊल टाकावे तसेच पोलिस अधिकारी, कर्मचार्यांच्या बदलीचा मुहूर्त काढावा, अशी मागणी केली जात आहे.
पोलिसांच्या हिताकडे होतोय दुर्लक्ष
रात्रंदिवस कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी (police department) पोलिस कर्तव्यावर असतात. सण, उत्सव, सामाजिक कार्यक्रम, शासकीय एव्हेंट आदि सुस्थितीत पार पडावे, यासाठी पोलिस सदैव तत्पर असतात. या सर्वांमध्ये आपल्या कुटूंबाला वेळ देणेही पोलिस विसरतात. परंतु, जेव्हा पोलिसांच्या हिताची गोष्ट आली की, त्याकडे सपशेल दुर्लक्ष केले जाते. असाच प्रकार पोलिसांच्या बदल्यांना घेवून जिल्ह्यात सुरू आहे. बदली प्रक्रियेत शासनाकडून दिरंगाई केली जात आहे. यामुळे पाल्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आले आहे. पण बदली कोणत्या जिल्ह्यात किंवा शहरात होईल हेच त्यांना माहीत नसते. त्यामुळे ते अॅडमिशन कोणत्या कॉलेजमध्ये घ्यावे हा विचार सुद्धा पोलिस करू शकत नाहीत. या सर्वांमध्ये पोलिसांची मुले मात्र अडचणीत सापडले आहेत. सरकार पोलिसांकडून रात्रंदिवस काम करून घेत असते. परंतु त्याच पोलिसांच्या वेल्फेअर पाहण्याची वेळ आली की त्यांच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करते. त्यामुळे पोलिसांच्या मुलांचा विचार करून त्यांच्या बदल्या वेळेतच कराव्यात. जेणेकरून (police department) पोलिसांना आपल्या मुलांसाठी शिक्षणाच्या दृष्टीने योग्य निर्णय घेता येतील, अशीच अपेक्षा पोलिस व्यक्त करीत आहेत.