शाळा सुरू होवून गणेवश नाहीच
तिरोडा/गोंदिया (Gondia School) : राज्य शासनाच्या वतीने जि.प., न.प. तसेच शासकीय शाळेत शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांना (Free uniform Yojana) मोफत गणवेश योजना सुरू करण्यात आली आहे. यासाठी हालचालीही सुरू झाल्या होत्या. परंतु, (Gondia School) शैक्षणिक सत्र २०२४-२५ सुरू होवून महिनाभराचा काळ लोटत असूनही विद्यार्थ्यांना गणवेश मिळालेले नाही. त्यामुळे साहेब! आम्हाला गणवेश मिळणार का? असा प्रश्न गरीब विद्यार्थी शासनाला करीत आहेत. मोफत गणवेशाची आस लावून चिमुकले गणवेशाविनाच शाळेत जात आहेत, हे विशेष.
राज्य शासनाच्या वतीने जिल्हा परिषद, नगर परिषद, महानगर पालिकेच्या शाळेत शिक्षण घेणार्या गरीब विद्यार्थ्यांना मोफत गणवेश देणार, अशी जाहिर करण्यात आले होते. त्यानुरूप प्रक्रियाही करण्यात आली. परंतु, गणवेशासाठी देण्यात आलेले कापड, शिलाई खर्च, टेंडर प्रकिया या सर्वांना घेवून भानगड निर्माण झाल्याने (Free uniform Yojana) मोफत गणवेश कुठे अडकले, हेच समजेनासे झाले आहे.परिणामी गणवेशाची आस लावून असलेल्या चिमुकल्यांचा हिरमोड झाला आहे. खाजगी शाळेतील मुलांचे गणवेश बघून सरकारी शाळातील विद्यार्थ्यांचे मन कासाविस व अधीर झाले आहे.
राज्य शासनाने ‘एक राज्य -एक गणवेश’ हे धोरण निश्चित करून शैक्षणिक सत्र २०२४ २५ पासून विद्यार्थ्यांना मिळणारे दोन्ही गणवेश थेट विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी मिळतील, असे परिपत्रक काढले होते. परंतु, शैक्षणिक सत्राला महिनाभराचा काळ लोटूनही विद्यार्थ्यांना गणवेशाची प्रतिक्षाच लागून आहे. यामुळे पालक व विद्यार्थी शाळेतील शिक्षक, मुख्याध्यापकांना गणवेश कधी मिळणार, असा एकच प्रश्न विचारत आहेत.
शासकीय शाळांत सुविधांचा अभाव
शासनाकडून मोफत शिक्षणाचा (Free education) दावा केला जात आहे. परंतु, ज्या शाळांमध्ये गरीब विद्यार्थ्यांना विद्यादानाचे कार्य सुरू आहे, त्यांची अवस्था बिकट झालीआहे. अनेक सरकारी शाळांच्या (Gondia School) इमारती पडक्या आहेत. शौचालय, पिण्याच्या पाण्याची सोय, हैण्डवाश स्टेशन, पुरेसे बसण्याचे बाक नाही. इमारतीच्या स्लैबमधून पावसाचे पाणी गळत आहे, भौतिक सोयी सुविधांच्या देखरेखीसाठी शाळांना पुरेसा निधी अभावामुळे सुविधांचा अभाव दिसून येत आहे. याकडे शासनाने कटाक्षाने लक्ष देण्याची गरज आहे.
गरीब विद्यार्थ्यांची थट्टा थांबवा
गरीब व आर्थिक दुर्बल घटकातील बालकांना शिक्षण मिळावे, यासाठी अनेक योजना आहेत. परंतु, (Free uniform Yojana) योजनांचा लाभ वेळेवर मिळत नसल्याने त्यांची शासनाकडून थट्टा केली जात आहे. गणवेश योजना सुरू करण्यात आली. परंतु, विद्यार्थ्यांना अद्यापपर्यत गणवेश मिळालेले नाही. तर ज्या (Gondia School) शाळांमध्ये विद्यार्थी शिक्षण घेतात, त्या ठिकाणी भौतिका सोयी-सुविधांचा अभाव दिसून येतो. यामुळे शिक्षणात मुले रमणार कशी? असा प्रश्न पालकांना पडला असून शासनाने गरीबांची थट्टा थांबवावी, अशी मागणी केली जात आहे.