शहरासह जिल्ह्यात जनाक्रोश आंदोलन
गोंदिया (Gondia) : मागील काही दिवसांपासून परभणी (Parbhani) येथील घटनेचे तिव्र पडसात पडू लागले आहेत. अशातच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Union Home Minister Amit Shah) यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल केलेले अपमानजनक वक्तव्याचा निषेध नोंदविण्यात आला. दरम्यान स्थानिक प्रशासकीय इमारती समोर विविध सामाजिक संघटनेच्या वतीने तसेच तालुकास्तरावर जनक्रोश आंदोलन (Janakrosh Movement) करण्यात आले.
पुरोगामी महाराष्ट्राला (Maharashtra) कलंक लावणाऱ्या घटना घडत आहेत. परभणी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर (Collector’s Office) असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची विटंबना करण्यात आली तसेच त्यानंतर झालेल्या हिंसाचारात पोलिस कोठडीत (Police Custody) असलेल्या सोमनाथ सुर्यवंशी (Somnath Suryavanshi) यांचा मृत्यू झाला. तसेच अनेक आंबेकरी अनुयायांवर गुन्हे दाखल करण्यात आले. तर दुसरीकडे याच प्रकरणावरून संसदेत (Parliament) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकेरी उल्लेख करीत त्यांना घेण्यापेक्षा ऐवढ्या वेळ भगवानाचे नाव घेण्याचे बोलून त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची किंबहुना संविधाची (Constitution) चेष्ठा करण्याचा प्रकार केला. त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी तसेच संविधानाची रक्षा करून देश संरक्षित ठेवण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. स्थानिक प्रशासकीय इमारतीसमोर सर्वसमाज विचार मंचच्या वतिने जनाक्रोश आंदोलन करण्यात आले. तर दुसरीकडे सडक अर्जुनी व इतर तालुक्यात ओबीसी संघर्ष कृती समितीच्या वतीने आंदोलन करून तहसीलदार मार्फत यंत्रणेला निवेदन सादर करण्यात आले.
गोंदिया येथील जनाक्रोश आंदोलन दरम्यान केंद्रीय गृहमंत्र्यावर कारवाई करण्यात यावी, परभणी येथील संबंधित पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा, सुरू असलेला कोबिंग ऑपरेशन (Cobbing Operation) थांबविण्यात यावा, मानवाधिकार आयोगाकडून (Human Rights Commission) स्वतंत्र तपास करण्यात यावा, उत्तरीय तपासणीचा अहवाल अनुसूचित जाती व जनजाती आयोगाला देण्यात यावा तसेच बिड जिल्ह्यातील मत्सजोग येथील सरपंच हत्याकांडातील दोषीवर कारवाई करण्यात यावी शिवाय विरोधी कृत्य थांबविण्यात यावे तसेच अनुसूचित जाती, जनजाती, अन्न पिछडा वर्ग व अल्पसंख्यकावर होणारे अन्याय थांबविण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन देण्यात आले.
आंदोलनात अनेक संघटनांचा सहभाग
आज स्थानिक प्रशासकीय इमारतीसमोर झालेल्या जनाक्रोश आंदोलनात (Public Agitation) शिव, फुले, शाहू, आंबेडकरी सर्वसमाज विचार मंच, संविधान मैत्री संघ, ओबीसी संघर्ष कृती समिती, ओबीसी सेवा संघ, ओबीसी अधिकार मंच, संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ, युवा बहुजन मंच, समता सैनिक दल, भारत मुक्ती मोर्चा, स्टूडेंट राइट्स असोसिएशन, युवा ग्रेज्यूएट फोरम, नेशनल आदिवासी पीपल्स फेडरेशन, ज्येष्ठ नागरिक मित्र मंडळ, संघर्ष वाहिनी, अवामे मुस्लिम संगठन गोंदिया, अन्याय निवारण मंच, संथागार परिवार, भीमघाट स्मारक समिती आदी संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.