भंगारवस्थेतील बसगाड्याची डोकेदुखी.!
गोंदिया (Gondia) : राज्य परिवहन महामंडळाचे (State Transport Corporation) गोंदिया व तिरोडा आगार दुर्लक्षित आगार म्हणून आता नावारूपास येवू लागले आहे. या आगाराला नव्या बस उपलब्ध करण्याऐवजी, इतर आगारातील जुन्या बस (Bus) पाठविल्या जातात. परिणामी भंगारवस्थेत आलेल्या एसटी बसने आगाराकडून प्रवासी सेवा पुरविली जात आहे. त्यातूनच एसटी बसने प्रवास करायचा आहे, तर आधी दे धक्का! अशी विनवनी वाहक व चालकांना प्रवाशांनाच करावी लागत आहे. अर्ध्या प्रवासात बंद पडलेल्या बसला प्रवाशाकडून धक्का देवून पुढच्या प्रवासाला जावे लागत आहे. ही बाब गोरेगाव-तिरोडा मार्गावर कुऱ्हाडी गावशिवारात प्रवाशांनी अनुभवली.
एसटीला प्रवाशांकडूनच द्यावा लागतो धक्का.!
जिल्ह्यातील गोंदिया वतिरोडा या दोन्ही आगारातील एसटी बस कुठे बंद पडतील आणि कुठे प्रवाशांना थांबावे लागेल, याचे नेम राहिले नाही. अनेकदा तर बंद पडलेल्या एसटीला प्रवाशांकडूनच (Passenger) धक्का मारणे भाग पडत आहे. भर दुपारी 1.20 वाजता तिरोडा आगाराकडून सुरू असलेली, बसफेरी गोरेगाव येथून एसटी क्र. एमएच-40/एम-9507 प्रवासी घेवून तिरोडाकडे निघाली.
एसटी बसला सुव्यवस्थित करावे.!
दरम्यान, कुऱ्हाड़ी गावशिवारात अचानक एसटी बंद पडली. मुख्य मार्गावरच एसटी बंद पडल्याने एकेरी मार्ग असल्याने मार्गावरील वाहतूकही ठप्प पडली होती. दरम्यान, रस्त्याच्या कडेला बस हटविण्यासाठीही प्रवाशांना धक्का द्यावा लागला. विशेष म्हणजे, गोंदिया व तिरोडा या दोन्ही आगारात 80 टक्के एसटी बस जुन्या आहेत. यामुळे दोन्ही आगारातील यांत्रिकी विभागही हतबल दिसून येत आहे. भंगारवस्थेत आलेल्या एसटी बसला सुव्यवस्थित करावे कसे, असा प्रश्नही यांत्रिकी विभागाकडे (Department of Mechanics) निर्माण होत आहे. तर दुसरीकडे या प्रकाराने चालक-वाहक चांगलेच त्रस्त झाल्याचे सांगितले जात आहे.