गोंडपिपरी (Gondpipari Crime) : दोघांचे एकमेकांवर प्रेम होतं. समाजाचे बंधन झुगारून तीन महिन्यापूर्वी त्यांनी आंतरजातीय विवाह केला. मात्र शनिवारची रात्र त्यांच्यासाठी काळ रात्र ठरली. दोघात वाद झाला. रागाच्या भरात पत्नी विहिरीकडे निघाली. तिच्या पाठोपाठ पती गेला. पत्नीने विहिरीत उडी घेतली तिला वाचवायला पतीने ही विहिरीत उडी घेतली. यात दोघांचाही करून अंत झाला. ही (Gondpipari Crime) हृदयदायक घटना गोंडपीपरी तालुक्यातील पानोरा या गावात शनिवारला रात्री दहा वाजता घडली. प्रकाश शरबत ठेंगणे, उषा प्रकाश ठेंगणे असे मृतकांची नावे आहेत.
प्राप्त माहिती नुसार, गोंडपिपरी तालुक्यात येणार्या पानोरा गावातील प्रकाश ठेंगणे यांचे इल्लूर गावातील उषा हिच्यावर प्रेम जडले. दोघे आंतरजातीय होते. तीन महिन्यापूर्वी ते दोघे विवाह बंधनात अडकले होते. मंदिरात जाऊन दोघांनी लग्न केले होते. लग्नानंतर दोघात नेहमी या ना त्या गोष्टीवरून नेहमी वाद होत असत. शनिवारला दि.२४ ऑगस्ट ला रात्री दोघात वाद झाल्याची चर्चा आहे. रागाचा भरात उषा विहिरीकडे निघाली. तिच्या पाठोपाठ प्रकाश गेला. काही कळायचा आत उषाने विहिरीत उडी घेतली. तीला वाचविण्यासाठी प्रकाशने विहिरीत उडी घेतली. यात दोघांचा मृत्यू झाला. (Gondpipari Crime) घटनेची माहिती गोंडपिपरी पोलीस स्टेशनचे ठाणेदार रमेश हत्तीगोटे यांना देण्यात आली. कर्मचार्यासह त्यांनी घटनास्थळ गाठले. रात्री उशिरापर्यंत दोघांचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आले. पुढील तपास पोलीस करीत आहेत.