कुरखेडा/गडचिरोली (Gondwana University) : तालूक्यातील दूर्गम भागात अतिशय विपरीत परीस्थीत लहानपणीच वडीलाचा छत्र हरपलेला (Shailendra Madavi) शैलेन्द्र मडावी (Shailendra Madavi) या आदिवासी समाजातील तरूणाने उच्च शिक्षण घेत, अकोला सारख्या शहरात विज्ञान विभागात सहायक प्राध्यापक पदापर्यंत मजल मारली. (Gondwana University) गोंडवाना विद्यापीठाने त्याना आचार्य ही पदवी बहाल केल्याने ते समाजाकरीता भूषणावह ठरलेले आहेत.
शैलेन्द्र मडावी यानी गडचिरोली जिल्हातील (Gadchiroli District) अत्यंत उपयुक्त खाद्य वनस्पतीचे अभ्यास करीत (Gondwana University) गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथे शोध प्रबंध सादर केला होता. अमरावती विद्यापीठाचे प्राध्यापक डॉ प्रशांत गावंडे यानी त्यांचा शोध प्रबंधास मान्यता प्रदान केली. पत्रान्वे गोंडवाना विद्यापीठाने त्याना “आचार्य” पदवी प्रदान केली शैलेन्द्र मडावी यानी विपरीत परीस्थीत वडेगाव सारख्या दूर्गम भागात प्राथमिक व माध्यमिक शिक्षण शाशकीय शाळेत पूर्ण करीत (Nagpur University) नागपूर विद्यापीठातून वनस्पती शास्त्र विषयात पदव्यूत्तर शिक्षण घेत, तसेच नेट सेट परीक्षा उत्तीर्ण करीत अकोला येथील आर एल टी विज्ञान महाविद्यालयात सहायक प्राध्यापक पदावर रूजू झाले. त्यांची ही गगणभरारी (Tribal youth) आदिवासी तरूणाकरीता प्रेरणादायी आहे.