गडचिरोली (Gondwana University) : गोंडवाना विद्यापीठाच्या (Gondwana University) वित्त विभागात कार्यरत (Finance Department) तृतीय श्रेणी लिपीकांनी तब्बल १.४६ कोटी रूपयांचा आर्थिक गैरव्यवहार केल्याचे निदर्शनास आले असल्याने विद्यापीठाच्या तक्रारीवरून गडचिरोली पोलीसांनी ४ आरोपींना अटक केली आहे. महेशकुमार उसेंडी,अमोल रंगारी,अमित जांभुळे आणि महेशकुमार उसेंडी याची पत्नी प्रिया मनोहर पगाडे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या आरोपींना ५ दिवसांची (Gadchiroli Police) पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.
प्राप्त माहितीनुसार गोंडवाना विद्यापीठात (Gondwana University) कार्यरत तृतीय श्रेणी कर्मचार्यांनी आर्थिक गैरव्यवहार केल्याचे विद्यापीठ प्रशासनाच्या निदर्शनास आले. यासंबधी विद्यापीठ प्रशासनाने केलेल्या चौकशीत १.४६ कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे आढळून आले. याबाबत (Gadchiroli Police) गडचिरोली पोलीस ठाण्यात सबंधित कर्मचार्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
5 दिवसांची पोलीस कोठडी
पोलिसांनी (Gadchiroli Police) चौकशी करून महेशकुमार उसेंडी,अमोल रंगारी,अमित जांभुळे आणि महेशकुमार उसेंडी याची पत्नी प्रिया मनोहर पगाडे यांना अटक केली आहे. त्यांच्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आरोपींना न्यायालयासमोर उभे केले असता ५ दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. पुढील तपास गडचिरोली पोलिस (Gadchiroli Police) करीत आहेत.दरम्यान या घटनेमुळे विद्यापीठ प्रशासनात खळबळ निर्माण झाली आहे.