मानोरा(Washim):- सोमवार चार तारखेपासून अधिकृत उमेदवार त्याचबरोबर बंडावर ठाम असलेल्या बंडोबाचा जोरात प्रचार सुरू झाला आहे. उमेदवारांना येत्या काही दिवसातील प्रचार फेऱ्या, बड्या नेत्यांच्या सभांची हवा निर्माण करण्यासाठी प्रचार सभेला गर्दी (crowd)जमविण्याचे काम सध्या मतदार संघात सुरू आहे. कार्यकर्त्यांच्या माध्यमातून गर्दी जमाविणे नाही. त्यामुळे झोपडपट्टी व गावातील रिकामे व मजूर वर्गाला अच्छे दिन आले आहे.
उमेदवारांनी मोठया मिरवणुका काढून शक्ती केले प्रदर्शन
सभा व प्रचार फेऱ्याना गर्दी जमविण्यासाठी मजुरांना मजुरी देऊन हजर करण्याचा फंडा आता प्रत्येकच निवडणूकीत दिसून येतो. झडपट्टी, गावातील रिकामे युवक व शेतमजूर यांना आमिष दाखवून रोजंदारीने सभेसाठी तयार केले जात आहे. निवडणुकीकरीता अर्ज दाखल करताना काही उमेदवारांनी मोठया मिरवणुका काढून शक्ती प्रदर्शन केले. काही उमेदवारांच्या रॅलीत मजुरांना रोज देवून आणण्यात आले होते.