मेरा बु(Buldhana):- आज पासून विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Elections) रणधुमाळीला सुरवात झाली असली तरी चिखली विधानसभा मतदार संघातून एकही इच्छुक उमेदवारांनी निवडणुक विभागाकडे एकही नामनिर्देशन दाखल केले नाही. त्यामुळे निवडणुक विभागात शुकशुकाट पाहायला मिळाला.
कोणालाही काहीही अडचण आल्यास तहसिलदार यांच्यां शी संपर्क साधावा असे आवाहन
चिखली विधानसभा मतदार संघात भाजप(BJP) आणि काँग्रेस (Congress) वगळता इतर पक्षांनी उमेदवार घोषित केले नसल्याने इंच्छुक उमेदवार पक्षाकडून कोणाला टिकिट देणार याकडे सर्वांचे लक्ष वेधून आहेत. आज रोजी भाजप पक्षाकडून श्वेताताई महाले आणि काँग्रेस पक्षाकडून राहूल बोंद्रे यांना उमेदवारी घोषित केली आणि शेतकरी संघटना, बीएसपी, आरपिआय, मनसे, वंचित बहुजन आघाडी, रासप या पक्षाकडून अद्यापर्यत उमेदवाराची घोषणा झालेली नाही. त्यामुळे आज नामनिर्देशन पत्र भरण्याच्या पहिल्या दिवशी एकाही इच्छुक उमेदवारांनी अर्ज भरले नाही मात्र काही इच्छुकांनी अर्जांची उचल केली अशी माहिती आह़े. ही विधानसभेची निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी निवडणुक निर्णय अधिकारी पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणुक विभागात(Election Department) काम करणारे कर्मचारी तैनात आहेत . तसेच सामान्य जनतेची कामे वेळेवर व्हावी तसेच त्यांना अडचणीचा सामना करावा लागणार नाही यासाठी चिखली तहसिलदार संतोष काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल कर्मचारी चांगल्या प्रकारे जनतेला सेवा देत आहेत. कोणालाही काहीही अडचण आल्यास तहसिलदार यांच्यां शी संपर्क साधावा असे आवाहन तहसिलदार संतोष काकडे यांनी दै देशोन्नती च्या माध्यमातून केले आहे.