मार्केट यार्डात हळदीला पंधरा हजार रुपये प्रतिक्विंटल पर्यंत मिळतोय दर
हळदीची आवक वाढली
वसमत (Bazar Samiti) : वसमत बाजार समितीच्या मार्केट यार्ड गेल्या आठ दिवसापासून हळदीची आवक वाढली असून, हळदीला दरही चांगला मिळत आहे प्रतिक्विंटल १३ ते १५ हजार रुपयांपर्यंतचा दर मिळत असल्याने हळद उत्पादक समाधान व्यक्त करत आहेत. नवीन हळद येण्यापूर्वी बाजारात जुनी हळद विकण्यासाठी शेतकरी हळद आणत आहेत. नवीन हळदीचा उतारा कमी असल्याने उत्पादन हॉटेल त्यामुळे यावर्षी हळदीचे दर वाढतील असा बाजाराचा अंदाज आहे.
यावर्षी हळदीला चांगला दर मिळाला हळद उत्पादकांना त्यामुळे लाभ झाला होता. मात्र वाढलेली हळद जुलै महिन्यापासून घसरली होती. आता पुन्हा हळदीच्या दरात तेजी झाली आहे. त्यामुळे (Bazar Samiti) बाजारात हळद घेऊन येणार्यांची संख्या वाढली आहे. गेल्या चार दिवसापासून हळदीच्या दरात वाढ झाली आहे १३००० ते १५००० रुपयांपर्यंत हळदीला दर मिळत आहे सध्या बाजारात जुनीच हळद येत आहे.
अजून नवी हळद आलेली नाही. यावर्षी हळदीचे उत्पादन कमी होईल, असा अंदाज आहे.अनेक भागात नवीन हळदीला खाली कीड लागल्यामुळे उतारा कमी येऊन उत्पादन घटनेची येण्याची शक्यता आहे. त्यामुळे मागच्या वर्षी तुलनेत यावर्षी (Bazar Samiti) बाजारात हळद कमी येईल. त्यामुळे हळदीचे भाव वाढतील असा बाजाराचा अंदाज आहे. त्यामुळे सध्या बाजारात हळदीच्या दरात तेजी दिसत आहे. हळदीचे वाढलेले दर पाहता साठवून ठेवलेली हळद विक्रीसाठी शेतकरी बाजारात घेऊन येत आहेत.