हिंगोली तालुका व शहर काँग्रेस कमेटी तर्फे आयोजन
ईव्हीएम हटावचा मुद्दा रेटून धरला
हिंगोली (Hingoli EVM campaign) : तालुका व शहर काँग्रेस कमेटीच्यावतीने ईव्हीएम हटाव (EVM campaign) राज्यव्यापी स्वाक्षरी मोहिमेचे आयोजन ८ डिसेंबर रोजी हिंगोलीत करण्यात आले होते. या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळाला.
हिंगोली शहरातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास अभिवादन करून ८ डिसेंबर रोजी स्वाक्षरी मोहिमेला सुरूवात करण्यात आली. यावेळी आमदार डॉ. प्रज्ञाताई सातव, जिल्हा परिषदेच्या माजी सभापती रूपाली पाटील गोरेगावकर, काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष बापूराव बांगर, जिल्हा उपाध्यक्ष सुरेश अप्पा सराफ, कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य शामराव जगताप गुरूजी, सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष सुदाम खंदारे, जिल्हा उपाध्यक्ष विलास गोरे, माजी नगरसेवक अनिल नैनवाणी, अ.माबुद बागवान, मुजीब कुरेशी, आरेफ लाला, बाशिद मौलाना, विद्यार्थी काँग्रेस जिल्हाध्यक्ष जुबेर मामू, अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष साद अहमद, गजानन देशमुख, बंटी नागरे, अजय बांगर, आबेद अली जहागीरदार, मिलींद उबाळे, प्रशांत बाहेती, फेरोज पठाण, अश्विन मुदीराज, चंदू प्यारेवाले, अक्षय डाखोरे, शेख अजीम आदींची उपस्थिती होती. स्वाक्षरी मोहिमेला सुरूवात झाली असून टप्याटप्याने ही मोहीम अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे.