ढोल ताशाच्या गजरात निरोप; भव्य मिरवणुकीने वेधले लक्ष!
मानोरा (Ganaraya Festival) : शांतता आणि उत्साहाच्या वातावरणात मानोरा शहरात गणेश विसर्जन सोहळा दि. ७ सप्टेंबर रोजी रविवारला सायंकाळी ५ वाजता भक्तिपूर्ण वातावरणात सुरू झाला, यावेळी ॲड ज्ञायक राजेंद्र पाटणी यांनी मिरवणुकीत सहभाग घेत बाप्पांचे दर्शन घेतले. यंदा गणेश मंडळांनी परंपरेनुसार भव्य मिरवणुका काढत (Ganaraya Festival) बाप्पाला निरोप दिला. यात ढोल-ताशांचा निनाद, बँजो यांच्यासह विविध सामाजिक व पौराणिक देखाव्यांनी शहरात एक वेगळेच चैतन्य निर्माण झाले होते.
शहरात ४ वाजता संततधार पावसाला सुरूवात झाली होती, परंतु १५ मिनिटानंतर ऐन मिरवणुकीला सुरुवात होताच पावसाने उघडीप दिल्यामुळे वसंतनगर मानोरा येथील संकट मोचन मंडळ, साई गणेश मंडळ, संतोषी माता नगर मधील गजराज गणेश मंडळ, सोमठाना चौकातील शहीद वीर भगतसिंग गणेश मंडळ, शिवाजीनगर येथील संघर्ष गणेश मंडळ, दिग्रस चौकातील राजस्थानी गणेश मंडळ, कोरपे कॉलनी येथील नवयुवक गणेश मंडळ, वडरपूरा मधील राधाकृष्ण गणेश मंडळ, जय बजरंग गणेश मंडळ भागातील सार्वजनिक गणेश मंडळाची मिरवणूक विशेष लक्षवेधी विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. मंडळाने आकर्षक देखावे आणि मोठ्या संख्येने बँजो, ढोल – ताशे पथक सहभागी करून घेतले होते.
या मिरवणुकीत शेकडो भाविक व (Ganaraya Festival) गणेश भक्त सहभागी झाले होते, पुरुष आणि लहान मुलांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. ‘पुढच्या वर्षी लवकर या’ असा जयघोष करत भाविकांनी बाप्पाचा निरोप घेतला. पोलीस प्रशासनाने उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाडवी यांच्या मार्गदर्शनाखाली मिरवणुकीसाठी चोख बंदोबस्त ठेवला होता. ज्यामुळे कोणतीही अनुचित घटना न घडता, विसर्जन शांततेत पार पडले. या यशस्वी गणेशोत्सव सोहळ्यात नागरिकांनी आणि भक्त मंडळांनी भक्तिभावाने सहभाग दर्शविला होता.
गणेश भक्तांचा उत्साहाचा हिरमोड!
मतदार संघातील कारंजा येथील गणेश विसर्जन शनिवारी ( दि. ६ सप्टेंबर ) रोजी डीजे डेसिबल आवाजात वाजवून पार पडला. परंतु मानोरा शहरात व तालुक्यात डिजे वरील कार्यवाही व डीजे विना गणपती विसर्जन करण्यात आले. त्यामुळे युवकांचा हिरमोड झाल्याने अनेक युवा गणेश भक्तांनी संताप व नाराजी व्यक्त केली.
विसर्जनाच्या दिवशी मद्यपी दुकाने सुरू!
रविवारी शहरातील सार्वजनिक (Ganaraya Festival) गणेश मंडळाचा विसर्जन होता. परंतु विसर्जनाच्या दिवशी शहरातील वाईनबार रेस्टॉरंट सुरू होते. त्यामुळे मद्यपी यांना पिण्यासाठी यंदा यावर्षी प्रथमच मोकळीक भेटली असल्याचे दिसून आले.




