Parbhani :- शहरातील वसमत रोडवर असलेले व्यंकटेश किराणा दुकान फोडत अज्ञात चोरट्यांनी दुकानातुन १ लाख १७ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना १७ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ च्या सुमारास उघडकीस आली. या प्रकरणी नवा मोंढा पोलिस ठाण्यात (Police station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नवा मोंढा पोलिसात गुन्हा दाखल
प्रविणकुमार अमिलकंठवार यांनी तक्रार दिली आहे. फिर्यादीचे वसमत रोडवरील काळीकमान परिसरात व्यंकटेश किराणा दुकान आहे. अज्ञात चोरट्यांनी १६ ऑक्टोबरच्या रात्री १० ते १७ ऑक्टोबरच्या सकाळी ८ या दरम्यान त्यांच्या दुकानाच्या छताचा वरचा पत्रा वाकवुन आत प्रवेश केला. दुकानातील किराणा साहित्य व रोख रक्कम मिळून १ लाख १७ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. घटनेची माहिती नवा मोंढा पोलिसांना देण्यात आली. अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पो.ह. सचिन गुरसुडकर करत आहेत.