गुंजाळा, व अंढेरा येथे स्व. गोपीनाथ मुंढे यांची जयंती उत्साहात साजरी
देशोन्नती वृतसंकलन
चिखली/बुलढाणा (Gopinath Mundhe) : कलावती महिला अर्बन को – ऑप क्रेडिट सोसायटी अंढेरच्या वतीने व गुंजाळा येथे लोकनेते स्व. गोपीनाथ मुंढे यांची 75 वी जयंती मोठया उत्साहात गावातून भव्य मिरवणूक काढून साजरी करण्यात आली. आणि सर्वांनी दिप पूजा करुण अभिवादन केले.
चिखली तालुक्यातील गुंजाळा येथे 50 टक्के वंजारी समाज आणि 50 टक्के बौद्ध समाज असल्याने दोन्ही समाज बांधव मिळून मिसळून उत्सव साजरे करतात. त्यात आज लोकनेते स्व. गोपीनाथ मुंढे (Gopinath Mundhe) यांची 75 वी जयंती साजरी होणार म्हणून गावातील महिलांनी घराघरापुढे आकर्षित रांगोळी काढून मिरवणुकीत प्रतिमेचे पूजन केले. तसेच तरुणाईनी लोकनेते स्व. गोपीनाथ मुंढे यांचा फोटो असलेला पोशाख परिधान करुण आनंद साजरा केला. मिरवणुकी दरम्यान डॉ बाबासाहेब आंबेडकर, यांच्या पुतळ्याला हार अर्पण केले.
यावेळी सुरवातीला सरपंच सुनिल केदार, माजी सरपंच दीपक केदार, पत्रकार प्रताप मोरे उपसरपंच सुधाकर खिल्लारे, ग्रा. प. सर्व सदस्य, तथा प्रतिष्ठित नागरिक गावकरी यांनी पुतळ्याला हार अर्पण करुण अभिवादन केले तसेच अंढेरा येथे कलावती महिला अर्बन को – ऑप क्रेडिट सोसायटी च्या वतीने माजी जि.प.अध्यक्षा नंदाताई कायंदे यांचे हस्ते प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी नंदाताई कायंदे (माजी अध्यक्षा जि.प. बुलढाणा), प्रा.दिलीप सानप, सौ. मीराताई दिलीप सानप (अध्यक्षा कलावती महिला अर्बन), सौ. ज्योती आंधळे, केदार साहेब (मंडळ अधिकारी), जगन सानप,रवींद्र सानप,संजय सरोदे(प्र. प्राचार्य श्री.औंढेश्वर विद्यालय अंढेरा ), रामेश्वर चेके, पत्रकार राधेश्याम ढाकणे, पत्रकार ज्ञानेश्वर म्हस्के,नागरे मामा, भगवान राठोड,नानाभाऊ आंधळे, नितीन नागरे, अनंथा ताठे, विष्णू केदार,राजीव तेजनकर,संजय हुसे, मुरलीधर गीते, सखाराम नाडे, कारभारी सानप मनोज सानप, सुनील राठोड,उद्धव सानप,गोपाल चेके, आश्रुबा कोकाटे,संदीप वनवे, सोनकांबळे मॅडम, पप्पू आंधळे, खंदारे मॅडम, उमेश बनसोडे,बनसोडे मॅडम, आंबीलकर मॅडम,कोतवाल मॅडम,पूनम इंगळे मॅडम,आदींची उपस्थिती होती.
या (Gopinath Mundhe) जयंतीसाठी अंढेरा ठाणेदार विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जमदार देढे तथा आदी पोलीस कर्मचारी यांची उपस्थिती होती.