सामाजिक समतेसाठी प्रतिष्ठानचे प्रयत्न काळाची गरज- श्रीकृष्ण कोकाटे
माझ्या राजकीय कारकीर्दीचे मार्गदर्शक गोपीनाथराव मुंडे -आमदार तानाजी मुटकुळे
सामाजिक प्रबोधनाच्या व्याख्यानमालेला प्रेक्षकाचा उदंड प्रतिसाद.
राष्ट्रीय लोकनेते गोपीनाथराव मुंडे व्याख्यानमालेचा समारोप
हिंगोली (Gopinathrao Munde) : येथील श्री संत भगवान बाबा प्रतिष्ठान आयोजित राष्ट्रीय लोकनेते गोपीनाथराव मुंडे व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प सुप्रसिद्ध व्याख्याते शिवचरित्रकार डॉ. अशोक बांगर बीड यांनी बहुजनांचे प्रेरणास्थान एक चिंतन या विषयावर कै .शिवाजीराव देशमुख सभागृह हिंगोली येथे पुष्प गुंफिले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हिंगोली विधानसभेचे आमदार श्री तानाजीराव मुटकुळे ,उद्घाटक म्हणून हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, प्रमुख पाहुणे माजी आमदार गजाननराव घुगे, माजी नगरअध्यक्ष बाबारावजी बांगर, लक्ष्मणराव बुधवंत व व्याख्याते डॉ. अशोक बांगर व माता भगिनी व बंधू हे मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उद्घाटक जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी गोपीनाथराव मुंढे यांच्या विचारांची वारसा व सामाजिक प्रबोधनाची चळवळ प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुनियोजित पद्धतीने चालवली जात आहे व समाजाच्या समतेसाठी प्रयत्न केला जात आहे, ही काळाची गरज आहे असे मनोगत व्यक्त केले. गोपीनाथराव म्हणजे एक परीस होते, त्यांच्या सहवासात येणाऱ्या प्रत्येकाचे सोने झाले. माझ्या राजकीय कारकीर्दीतील मार्गदर्शक म्हणजे मुंडे साहेब आहेत असे मनोगत आमदार तानाजी मुटकुळे यांनी व्यक्त करत कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप केला.
प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित सामाजिक चळवळीला प्रेरणा देण्याचे काम प्रसार माध्यमाने केले त्याचे प्रतिनिधी म्हणून व सामाजिक कार्यकर्ते ज्येष्ठ पत्रकार तुकाराम झाडे यांचा तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर व्याख्यानमाला आयोजित करून सामाजिक प्रबोधन करीत असलेल्या संयोजकांचा मान्यवरांच्या हस्ते श्री संत भगवान बाबा प्रतिष्ठान वतीने सत्कार करण्यात आला.
शिवचरित्रकार व सुप्रसिद्ध व्याख्याते डॉ. अशोक बांगर यांनी-स्वतःच्या पहाडी आवाजात व उत्कृष्ट शैलीत बहुजनांचे प्रेरणास्थान एक चिंतन या विषयावर तिसरे पुष्प गुंफतांना श्रोत्यांना संबोधित केले यामध्ये माणसाला कर्तृत्वाने मोठे व्हावे लागते . महापुरुषांना जातीच्या चौकटीमध्ये बांधणे योग्य नाही . पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, श्री संत भगवान बाबा ,लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी आपल्या कर्तृत्वातून समाजाला दिशादर्शक व सामाजिक समतेकडे नेले आहे. इतरांच्याही धर्मांचा आदर करण्याच्या व सर्वांसाठी कल्याणकारी व्यवस्था निर्माण करण्याचे कार्य केलेला आहे.
दलितांच्या मुक्तीसाठी भक्ती करणारे संत भगवान बाबा होते. आजच्या आधुनिक काळात यशाचा मार्ग मिळविण्यासाठी व समाजात समता निर्माण करण्यासाठी युवकांनी महापुरुषांच्या विचारांचे आचरण करावे ही आजच्या काळाची गरज झालेली आहे. राजकारणातील उच्च पदावर विराजमान झाल्यानंतर सुद्धा ऊसतोड कामगाराच्या प्रश्नांना उकल व मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ असे नाव देण्यासाठी केलेला संघर्ष सर्वसामान्यांचे प्रश्न सहानुभूतीने व समन्वयाने सोडणारा लोकनेता म्हणजे गोपीनाथराव आहेत त्यांच्या विचारांचे जागर केला पाहिजेत या अनेक विषयी भाष्य करत व्याख्यानालाच्या व्याख्यानाला पूर्णविराम दिला. लोकनेते गोपीनाथराव मुंडे व्याख्यानमालेतील तिसऱ्या पुष्प या क्रमाचे सूत्रसंचालन सारंग गीते,प्रास्ताविक एकनाथ कुटे पाहुण्यांचा परिचय राजकुमार मोरगे,आभार प्रदर्शन सुनील घुगे यांनी केले.
लोकनेते गोपीनाथराव मुंडे व्याख्यानमाला यशस्वी करण्यासाठी श्री संत भगवान बाबा प्रतिष्ठानचे मेजर पंढरीनाथ घुगे, एकनाथराव कुटे, कैलासराव बांगर, प्रा. मुरलीधर जायभाय, डॉ सुधीर वाघ, संजय बांगर ,राजकुमार मोरगे, डॉ. नागेश बांगर, पिंटू नागरे, संजय चाटे, गोपाल बांगर ,सुनील घुगे, शिवाजी घुगे, अनिल मुंडे, राहुल बांगर, छाया गुट्टे, सारिका चाटे, सिंधू कुटे ,स्वर्ण वाघ, कल्पना बांगर जयश्री घुगे डॉ. विद्याराणी बांगर, सुरेखा बांगर,,ज्ञानु बांगर,प्रणव, बंटी, ग्रामीण व शहरी भागातील श्रोते मंडळी यांनी परिश्रम केले. सामूहिक राष्ट्रगीताने लोकनेते गोपीनाथराव मुंडे व्याख्यानमालेचा समारोप करण्यात आला.