देशभरातून आलेल्या महंताचा सत्कार
मानोरा (Gor Banjara) : तिर्थक्षेत्र पोहरादेवी वसंतनगर येथील गोर बंजारा धर्मपीठ भक्तीधाम येथे रामराव महाराज फॉउनडेशनच्या वतीने दि. ११ जानेवारी रोजी सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला . या (Gor Banjara) कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून धर्मगुरू आमदार बाबुसिंग महाराज होते . प्रमुख अतिथी म्हणून महंत जितेंद्र महाराज, महंत कबिरदास महाराज, महंत यशवंत महाराज, महंत गणपती महाराज, हतीराम महाराज संस्थांनचे महंत गणेश महाराज यांच्यासह अनेक महाराज व सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रात काम करणारे शेकडो मंडळीची उपस्थिती होती.
कार्यक्रमाकरिता राजस्थान, मध्यप्रदेश, आंध्र, तेलंगाना, हरियाणा, पंजाब, दिल्ली , गुजरात या राज्यातून मोठ्या संख्येने प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित झाले होते. सर्व मान्यवरांचे फेडरेशनच्या वतीने पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी धर्मगुरू आ. बाबुसिंग महाराज यांनी आशीर्वाद दिले व महंत जितेंद्र महाराज यांनी समाजाला धर्मांतर विषयी संदेश दिला, तसेच देशामध्ये कुठेही समाज धर्मपरिवर्तन करू नये असे आव्हान केले. (Gor Banjara) कार्यक्रमाचे आयोजन रामराव महाराज फाउंडेशन च्या वतीने विजय राठोड यांच्या कडून करण्यात आलेला होता. धर्मपीठावर आलेल्या सर्व मान्यवरांचे राहण्याची चोख व्यवस्था धर्मपीठ भक्तिधाम च्या वतीने करण्यात आली होती.




