गोरेगाव/हिंगोली (Goregaon Crime) : सेनगाव तालुक्यातील गोरेगाव पोलिस ठाणे (Goregaon Police) अंतर्गत घटनेत एका विधवा महिलेस लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी शारीरिक संबध ठेवणे,गर्भपात करणे, कुटुंबातील इतरांकडुन जिवे मारण्याच्या धमक्या देण्याच्या कृत्य प्रकरणात वाशिम जिल्ह्यातील गोभणी येथील पाच जणांविरूध्द १९ जून रोजी विविध कलमान्वये गुन्हा दाखल (Goregaon Crime) करण्यात आला आहे.
गोरेगाव पोलिस ठाणे हद्दीतील घटना
गोरेगाव पोलिस ठाणे (Goregaon Police) अंतर्गत असलेल्या एका गावातील २८ वर्षीय विधवा महिलेस आरोपी गजानन विलास साबळे रा.गोभणी ता.रिसोड याने लग्नाचे आमिष दाखवून ७ डिसेंबर २०२० रोजी सदर महिलेच्या राहत्या घरी पिडीतेच्या मनाच्या इच्छे विरुद्ध शारीरिक संबध साधत, गेल्या चार वर्षापासून वेळोवेळी वेगवेगळ्या ठिकाणी बळजबरीने कृत्य केल्या गेले. या (Goregaon Crime) संदर्भात महिलेने लग्नाचा विषय काढल्यानंतर लग्न करण्याच्या बाबतीत नेहमी टाळाटाळ करून अखेर नकार दिला.
5 आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल
दरम्यान, शारिरीक संबधातून विधवा महिला दोन महिन्याची गर्भधारणा झाली असता नकळत तिला गोळ्या देऊन अमरावती येथे नेवून गर्भपात करण्यात आला. तसेच तिचे बनावट आधारकार्ड देखील काढण्यात आले. आरोपीच्या आई वडीलांनी लग्न होऊ देणार नाही म्हणत धमक्या दिल्या. तसेच बहिनीने सुध्दा विरोध दर्शवत धमक्या दिल्या. पिडीत विधवा महिलेच्या मोबाईल मधील पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करून (Goregaon Crime) जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या अशा आशयाची फिर्याद १९ जून रोजी पिडीत महिलेने गोरेगाव पोलिसात दिली.
या (Goregaon Crime) प्रकरणात गजानन विलास साबळे, विलास श्रीपत साबळे,राधाबाई विलास साबळे, ज्योती विलास साबळे, सर्व रा.गोभणी ता. रिसोड जि.वाशिम, रेखा बनसोड रा.वाशिम यांच्याविरूद्ध विविध कलमान्वये गोरेगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. सदर घटनेत आरोपी अद्याप अटक नसल्याची माहिती (Goregaon Police) पोलिसांनी दिली असून या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक रवींद्र हुंडेकर हे करीत आहेत. गुन्ह्यातील आरोपींना लवकरच ताब्यात घेण्यासाठी हालचाली सुरू असल्याचे समजले आहे.