गोरेगाव/हिंगोली (Goregaon Police Station) : सेनगाव तालुक्यातील गोरेगाव पोलिस ठाणे हद्दीतील चोंढी माळसेलु रस्त्यावर २३ ऑगस्ट रोजी रात्रीच्या हिंगोली केंद्रा फेरीचे चालक रमेश भिमराव भालेराव यांना सापडलेल्या थैलीत मिळुन आलेले १ लाख ९७ हजार त्यांनी (Goregaon Police) पोलीस ठाण्यात जमा केले होते. सदर घटनेत पोलिसांनी प्राप्त रक्कम हरविलेल्या नोंदीची शहनीशा करुण जगदिश मोहनलाल तोष्णीवाल रा रिसोड यांना परत केली. या प्रसंगी (Bus driver) चालक भालेराव यांच्या निष्काम सेवेचा सत्कार सन्मान ठाण्याच्या वतीने ९ सप्टेंबर रोजी करण्यात आला आहे.
गोरेगाव पोलिस ठाणे हद्यीतील चोंढी माळसेलु रस्त्यावर २३ ऑगस्ट रोजी हिंगोली केंद (Bus driver) बसचे चालक रमेश भिमराव भालेराव यांना १ लाख ९७ हजार रक्कमेची प्लस्टिकची पिशवी आढळुन आली होती. पिशवीतील मोठी रक्कम पाहता भालेराव यांनी सदर रक्कम ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक निलेश लेनगुळे यांची भेट घेऊन घटनेचा तपशील कथन करुन रक्कम त्यांचेकडे सुपुर्द केली होती. (Goregaon Police) पोलिस उपनिरीक्षक लेनगुळे यांनी इन कॅमेरा रकमेचे मोजमाप करुन रितसर नोंद घेत (Bus driver) बस चालक भालेराव यांना रक्कमे बाबत पत्र दिले होते. या घटनेची पोलिसांनी गोपनियता ठेवली होती.
५ सप्टेंबर रोजी जगदिश मोहनलाल तोष्णीवाल मुळ गाव ताकतोडा हमु रिसोड यांनी तक्रार नोंदवुन रक्कम चोंढी माळसेलु दरम्यान हरविल्याचे नमुद करत शोध घेण्याची मागणी केली होती या प्रकरणात पो नी शामकुमार डोंगरे यांचे मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक निलेश लेनगुळे यांनी रक्कम कश्यात होती, नोटा कितीच्या होत्या, कोठुन आनल्या होत्या, आदी पडताळणी केली असता, सापडलेल्या प्राप्त रकमेशी समानता जुळुन आल्याने १ लाख ९७ हजाराची रक्कम तोष्णीवाल यांना परत देण्याची प्रक्रीया पार पाडुन ९ सप्टेंबर रोजी बस चालक रमेश भालेराव यांना ठाण्याला बोलावुन जगदिश तोष्णीवाल यांचे समक्ष ठाण्याच्या वतीने (Bus driver) रमेश भालेराव यांच्या सेवा कार्याचे कौतुक करूण (Goregaon Police) पोलिस उपनिरीक्षक निलेश लेनगुळे यांचे हस्ते सत्कार सन्मान करण्यात आला आहे. भालेराव यांच्या निष्काम सेवेचे गावात तथा पंचक्रोशीत कौतुक होत आहे.