गोरेगाव ग्रामपंचायत संलग्न असलेल्या नागमाथा येथील घटना
गोरेगाव/हिंगोली (Goregoan cremation) : सेनगाव तालुक्यातील गोरेगाव ग्रामपंचायत सलंग्न असलेल्या नागमाथा गावच्या गावकर्यांनी ३१ ऑगस्ट रोजी सकाळी गोरेगाव रिसोड मार्गावरील फाट्यावर ऐन मध्य रस्त्यात अंत्यविधीचे सरण रचुन रास्तारोको केला स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून न दिल्यास मयताचा अंत्यविधी करण्याचा पवित्रा घेतला होता प्रशासनाने यावर तोडगा काढत शाळे लगतची जागा उपलब्ध करून दिल्याने या प्रश्नावर पडदा पडला आहे. त्यानंतर (Goregoan cremation) मयताचे अंत्यसंस्कार पार पडले.
गोरेगाव गट ग्रामपंचायत मधे सलंग्न असलेल्या नागमाथा गावाची कुटुंब संख्या शंभराच्या आसपास आहे. गाव मुलभुत विकासाच्या बाबतीत मागासलेले आहे. गावात मयताच्या अंत्यविधी साठी एकही स्मशानभुमी (Goregoan cremation) नसल्याची विदारक शोकांतिका आहे. मयताचे अंत्यसंस्कार ज्याला त्याला आपल्या मालकीच्या शेतात करावे लागतात तर गोरगरीब मजुरदार ज्यांचेकडे शेतीच नाही अशांच्या अंत्यविधी प्रसंगी मोठा बिकट प्रश्न उपस्थित होता.
अनेक वेळा मागणी करुनही आश्वासना शिवाय काहीच मिळाले नाही. मार्च २०२३ मधे लेखी अर्ज करूनही दखल घेतल्या गेली नाही. ३१ ऑगस्टला सकाळी त्र्यंबक महादजी गुहाडे (७०) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. अंत्यविधीच्या प्रश्नावर संतप्त पुरूष महिला गावकर्यांनी फाट्यावर पोहचुन गोरेगाव-रिसोड राज्य मार्गावर एैन रस्त्याच्या मध्यभागी अंत्यविधीचे सरण रचून दुपारी १.३० वाजण्याच्या आत अंत्यविधीसाठी जागा उपलब्ध करून न दिल्यास अंत्यविधी येथेच करण्याचा पवित्रा घेत ठिय्या मांडून रास्तारोको केला होता.
वाहन वाहतूक, दळणवळण ठप्प झाले होते. सदर घटनेच्या माहितीने तालुका तहसीलचे नायब तहसीलदार कारगुडे, पोनि श्यामकुमार डोंगरे, ग्रामविकास अधिकारी सालेगावकर, तलाठी प्रदीप इंगोले, दासराव कावरखे पाटील, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष अमोल पाटील, राहुल खिल्लारी पाटील आदी स्थळ ठिकाणी पोहचून समस्या जाणून घेत नागमाथा गावात जागेची पाहणी केली. गावातील प्रमुखांच्या सोबत शाळे लगतची जागा निश्चीत करून गावकर्यांचा पवित्रा शांत केल्याचे वृत्त आहे. दुपारी मयत त्र्यंबक महादजी गुहाडे यांचा अंत्यविधी उपलब्ध करून दिलेल्या जागेवर करण्यात आल्याचे वृत्त आहे.
नागमाथा ग्रामस्थांनी स्मशानभूमिच्या (Goregoan cremation) कारणातून रस्त्यावर मृतदेहासाठी सरण रचले होते. अखेर प्रशासनाच्या अधिकार्यांनी चर्चा केल्यानंतर गावठाणातील दहा गुंठे जागा स्मशानभूमिसाठी मोजून देण्यात आली. सदर जागेवर सुस्थित सोयींनी युक्त स्मशानभूमी शेड उभारून द्यावे असा प्रस्ताव कोंडीबा काशीराम खटके, अनिल तीखंडके यांनी व्यक्त केला आहे. प्रशासनाने विनाविलंब मागणीची पूर्तता करणे हितावह असणार आहे. वाहतूक ठप्प अंत्यसंस्काराच्या प्रकरणावरून सकाळी ८ वाजल्या पासून दुपारी १ वाजेपर्यंत तब्बल ५ तास वाहतूक ठप्प झाली होती.