मासळ (Gosekhurd Dam) : गोसेखुर्द धरण (इंदीरा सागर) हे भंडारा जिल्ह्याला पवनी-लाखांदुर तालुक्याला विशेष वरदान ठरत अथवा ठरणारे असले तरी (Gosekhurd Dam) गोसेखुर्द डावा कालवा मुख्य तथा त्याचे उप कालवे बांधकाम शेतकर्यांना फायद्याचे असले तरी हे निकृष्ठ, अनियमित, अपुर्ण, अयोग्य, नियोजन शुन्य तथा बहुतांश चुकीचे झाले असुन या कालव्यामुळे त्याचा दरवर्षी फटका शेतकर्यांना बसत आहे. की त्याच त्याचे कुठे अंशत: तर कुठे पुर्णत: नुकसान होत असल्याचे पाहावयास मिळत आहे.
भागडी शेतशिवारात धान पिक पाण्याखाली
यावर्षी पावसाचे जवळपास तीन नक्षत्र संपण्याचे मार्गावर असुन सुद्धा जिल्ह्यात विशेष गोसेखुर्द डावा कालवा परिसरात योग्य पाऊस न झाल्याने शेतकर्यांच्या धान पर्हे व रोवणीला पाण्याची नितांत गरज असल्याने परिसरातील शेतकर्याकडुन कालव्यांना पाणी सोडण्याची विनंती करण्यात आली असावी म्हणुन सबंधीत (Canal Administration) कालवा विभागाने नहराला पाणी सोडले असता हे पाणी सरांडी/बु.येथे रात्री सरांडी/बु.० मिटर गेट पर्यंत पाण्यासह घाण कचरा, तणस, गोनटी पोते वाहत आले असता मुख्य गेट व इतरही दोन गेट बंद असुन एकच गेट सुरु असता या ठिकाणी पाणी अडुन पुर्ण पाणी व घाण कचरा खुल्या असलेल्या ओपारा कालव्याला वाहल्याने समोर घाण कचरा अडल्याने समोर पाणी वाहणे अडले. व सदर कालवा फुगुन नवीन मातीकाम केलेल्या ठिकाणावरुन कालवा फुटला असता शेतात पाणी शिरल्याची ओरड सुरु झाली.
नहर व संबंधीत प्रशासन निद्रावस्थेत
त्यामुळे सकाळी ७ वाजता सरांडी/बु.येथील ० मिटर गेट जवळ ओपारा उपकालवा फुटल्याचे कळले असुन सरांडी/बु. व भागडी शेतशिवारात (Gosekhurd Dam) नहराचे पाणी नाल्याला येवुन जवळपास चाळीस ते पन्नास एकर आवते धान व धान पर्हे बुडाले आहेत. यात भागडी व सरांडी येथील तीस ते (Bhandara farmar) चाळीस शेतकर्यांची धान पिक पाण्याखाली असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. पाणी शिरुन शेतात कृत्रिम पूर परिस्थिती नहर प्रशासनामुळे निर्माण झाली आहे. परंतु (Canal Administration) नहर प्रशासनाने नहराला पाणी सोडते वेळी नहर पाणी जाण्यास साफ आहे का? गेट व्यवस्थित आहे काय? तसेच गेट किपर यांना सुचित करणे, असे योग्य नियोजन न करता नहराला पाणी सोडुन शेतकर्यांचे नुकसान होत आहे याला जबाबदार कोण? तसेच मागील पाच-सहा दिवसापासुन नहर तुटलेला व सदर माहिती दिली असतांनाही पार बांधण्यात येत असल्याने नहरप्रशासनासह (Canal Administration) संबंधीत महसूल विभाग (Department of Revenue) गाढ निद्रावस्थेत आहेत की काय अशी शेतकर्यांकडुन शब्द कानी पडत असुन प्रशासनाप्रती रोष व्यक्त केला जात आहे. करीता शेतकर्यांच्या झालेल्या नुकसानीची नुकसान भरपाई देण्यात यावी व तात्काळ फुटलेल्या कालव्याची दुरुस्ती कालवा प्रशासनाने करावी, अशी मागणी (Bhandara farmar) शेतकरी बांधवाकडुन होत आहे.