अर्जुनी मोरगाव (Gothangaon Forest Elephant) : तालुक्यातील नागणडोह परिसरासह इतर ठिकाणी मागील वर्षी हत्तींच्या कळपाने धुमाकूळ घालून धानपिकांसह घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले होते. यातील अनेकांना अद्यापही नुकसान भरपाई मिळालेली नाही. त्यातच पुन्हा नवेगावबांध परिसरातील टोली वसाहतीत (Forest Elephant) हत्तींच्या आगमनाची चाहुल त्यांच्या पायखुणावरून २५ जुलै रोजी उघडकीस आले होते. त्यातच तालुक्यातील गोठणगाव व जुनेवानी परिसरात हत्ती आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. परिणामी शेतकर्यांमध्ये चिंता दिसून येत आहे.
नवेगावबांध परिसरातील डेपो, ओव्हर फ्लो कडील टोलीवसाहतीत हत्तींच्या पाऊलखुणा दिसून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मागील वर्षी (Forest Elephant) हत्तींच्या कळपाने नागणडोहसह परिसरात घातलेला धुमाकूळ चांगलाच चर्चेत आला होता. यात अनेक शेतकरी कुटूंबाचे नुकसान झाले. मात्र अद्यापही त्या कुटूंबाना मदत मिळालेली नाही. अशात पुन्हा हत्तीच्या पाऊल खुणा दिसून आल्याने चिंता निर्माण झाली आहे. गेल्या तीन दिवसांपासून येथे व परिसरातील शेतकर्यांमध्ये खळबळ उडवून देणारा हत्ती नवेगावबांध परिसरात परिसरात व २७ जुलै रोजी दिसून आलेला गजराज गोठणगाव वनपरिक्षेत्रात (Gothangaon Forest Elephant) असल्याची माहिती वन विभागाने दिली आहे. त्यातच खोकरी ते चिचोली दरम्यान हत्तीच्या पाऊल खुणा एका शेतात दिसून आल्या आहेत. त्यामुळे हत्ती हा गोठणगाव परिसरात वास्तव्याला असल्याची पुष्टी वन विभागाने केली आहे. परिसरात वास्तव्य करून आज दुपारच्या गस्ती दरम्यान हत्ती गोठणगाव वनपरिक्षेत्रातील केळवद येथील योगराज शहारे व कांतीलाल नंदेश्वर यांच्या शेतातून गवर्रा पांदन रस्त्याने परसटोला व तेथुन जुनेवाणी बिटाकडे गेला असल्याची माहिती आहे.
प्रादेशिक वनविभागाच्या पथकाची नजर
हत्तीचे आगमन झाल्याने तालुक्यात चिंता निर्माण झाली आहे. यामुळे कोणतीही हानी होऊ नये, या दृष्टीने प्रादेशिक (Gothangaon Forest Officer) वनविभागाच्या अधिकारी व कर्मचार्यांचे पथक हत्तीच्या संपूर्ण हालचालीवर नियंत्रण ठेवून आहे. गोठणगाव ते जुनेवाणी पर्यंत प्रादेशिक वन विभागाचे फिरते गस्तीपथक हत्तीच्या हालचालीवर लक्ष ठेवून आहे.
गावातील लोक सतर्क
शेतात जातांनी गटागटांमध्ये सावधरित्या जावे, कुठलीही हरकती करू नये, हत्तीच्या जवळ जाऊ नये. त्याला चिथावण्याचा प्रयत्न करू नये, (Forest Elephant) हत्ती बिथरतील असे कुठलेही कृत्य नागरिकांनी करू नये, अशा सुचना वनविभागाच्या वतीने क्षेत्रातील नागरिकांना देण्यात आल्या आहेत. तसेच हत्ती जुनेवाणी, राजोली मार्गे गडचिरोली जिल्ह्यात प्रवेश करतो की, परत नवेगावबांध परिसराकडे वळतो, याकडे लक्ष लागले आहे.
गोठणगाव वनपरिक्षेत्रातील खोकरी ते चिचोली दरम्यान आज शेतामध्ये हत्तीच्या पाऊलखुणा आढळून आल्या आहेत. विभागाचे गस्तीपथक (Forest Elephant) हत्तीच्या हालचालीवर नियंत्रण ठेवून आहे. हत्ती परिसरात दाखल झाल्याची व संभाव्य धोक्याबाबत क्षेत्रांतर्गत गावात जनजागृती सुरू आहे.
– मिलिंद पवार वनपरिक्षेत्र अधिकारी, गोठणगाव वनक्षेत्र.