शासकीय तंत्रनिकेतन येथे माजी विद्यार्थी मेळावा!
वर्धा (Gov Technical College) : आर्वी जीवनात कुठल्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी यशाची, परिणामांची, फळाची चिंता न करता प्रयत्नांची प्रामाणिकता, सातत्य राखत योगदान दिल्यास जीवनाच्या कुठल्याही क्षेत्रात यश प्राप्त होऊ शकते. इटालियन भाषेतील ‘के सरा सरा’ या प्रसिद्ध कवितेतील ओळी सांगून त्या कशा त्यांच्या जीवनात प्रेरणास्थान ठरल्या हे उपस्थितांना सांगितले व भविष्यात आर्वीच्या संस्थेला राज्यातील अव्वल क्रमांकाचे तंत्रनिकेतन बनविण्याचे आश्वासन आमदार व संस्थेचे माजी विद्यार्थी सुमित वानखेडे यांनी मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी दिले. शासकीय तंत्रनिकेतनच्या स्थापनेपासून म्हणजेच 1990 पासूनचे अनेक माजी प्राचार्य व सेवानिवृत्त प्राध्यापक माजी विद्यार्थी यांचा शासकीय तंत्रनिकेतन संस्थेत 18 जानेवारीला माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
आमदार सुमित वानखेडे यांचे प्रतिपादन!
त्यावेळी ते बोलत होते, कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एम. ए. अली होते. मेळाव्याचे उद्घाटक म्हणून आमदार व संस्थेचे माजी विद्यार्थी सुमित वानखेडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी विद्यार्थी मेळाव्याचे (Student Gatherings) संयोजक निलेश देशमुख, जिमखाना उपाध्यक्ष प्रा. एस. एस. मून, समन्वयक प्रा. रश्मी खेर्डेकर उपस्थित होते. याप्रसंगी पदविका त्यांच्या बॅचचे तसेच 2006 पूर्वी पदविका प्राप्त बहुसंख्य विद्यार्थी (Students) उपस्थित होते.
संस्थेच्या अभ्यासक्रमांचा, विभागांचा व प्रगतीचा आलेख विद्यार्थ्यांनी जाणून घेतला. तसेच अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना यशस्वी जीवनाचा कानमंत्र दिला. याप्रसंगी शासकीय तंत्रनिकेतनच्या स्थापनेपासून म्हणजेच 1990 पासूनचे अनेक माजी प्राचार्य, ज्येष्ठ व सेवानिवृत्त प्राध्यापक (Professor) तसेच अनेक माजी कर्मचारी यांची आवर्जून उपस्थिती होती.
यावेळी माजी प्राचार्य टाले, सरोदे, शिंगाडे, रेकडे, रेवस्कर, साखळकर, सेवानिवृत्त प्रा. गुजर, अधीक्षक प्रा. ए एम खान, प्रा. डांगरे, प्रा. बनसोड, ज्येष्ठ प्राध्यापक ढोक, थोरात, प्रा. पीपी पवार, प्रा. मुधोळकर, प्रा. काळपांडे, कामडी, काळे, डेबे आदींचा शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार (Honorary Award) करण्यात आला. कार्यक्रमाला रसायन अभियांत्रिकी, अनुविद्युत यंत्र व विद्युत अभियांत्रिकीचे एकूण 282 माजी विद्यार्थी उपस्थित होते. प्रास्ताविक निलेश देशमुख यांनी केले. संचालन प्रा. तुषार खोडके, अंकुश हलकरे यांनी केले. आभार प्रा. रश्मी खेर्डेकर यांनी मानले.
आपल्या आयुष्यातील हा सर्वात भव्यदिव्य मेळावा…
आपल्या आयुष्यातील हा सर्वात भव्यदिव्य मेळावा असल्याचे कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. एम. ए. अली यांनी सांगितले. याप्रसंगी माजी प्राचार्य डॉ. शिंगाडे यांनी वडिलांच्या तर माजी प्राध्यापक व उपकार्यकारी अभियंता रमण लायचा यांनी मुलगी स्वर्गीय प्रियांक्षी हिच्या स्मृतीप्रित्यर्थ संस्थेतील गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांसाठी पारितोषिकांची घोषणा केली.