महाराजस्व अभियान अंतर्गत भटक्या विमुक्त नागरिकांना जाती प्रमाणपत्र वाटप
अर्जुनी मोर (Sikh community) : समाजातील कुठलाही घटक मूलभूत गरजांसह शासकीय योजनांपासून वंचित राहू नये यासाठी शासन विविध अभियान राबवित आहे. समाजातील प्रत्येक घटक विकासाच्या प्रवाहात यावा हा शासनाचा उद्देश आहे. तालुक्यात अनेक ठिकाणी भटक्या विमुक्त जमातीचे नागरिक आहेत.हा समाज अद्यापही मुख्य प्रवाहात नाही.शहरातील शिखलकर(शीख) समाज (Sikh community) स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही दस्ताऐवजांच्या कमतरतेमुळे दुर्लक्षित होता. शासनाच्या महाराजस्व अभियानामुळे या समाजाला जातीचे दाखले मिळाले. यापुढे घरकुल, शिक्षनासह शासनाच्या विविध योजनाचा लाभ मिळण्यासाठी मदत होईल. शासन या समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कटीबद्ध राहील, असे प्रतिपादन उपविभागीय अधिकारी वरुणकुमार शहारे यांनी केले.
ते राजे उमाजी नाईक अभियानांतर्गत भटक्या विमुक्त समाजातील नागरिकांना शासनाच्या महाराजस्व अभियान अंतर्गत येथील शिखलकर समुदायाला जाती प्रमाणपत्र, बोनाफाईड सर्टिफिकेट दास्तावेज वाटप कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बोलत होते. यावेळी तहसीलदार अनिरुद्ध कांबळे, ठाणेदार सोनटक्के, नगरसेविका सपना उपवंशी, तलाठी अरविंद झलके, सुनील देशमुख, देवानंद गजापुरे उपस्थित होते. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सिंगलटोली येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी (Sikh community) शिखलकर समाजातील 13 लाभार्थ्यांना जाती प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. उर्वरित कुटुंबियांना पुढील काळात प्रमाणपत्र वाटप होतील. समाजाने शिक्षित व्हावे. शासन तूमच्या कायम पाठीशी असल्याचे मत तहसीलदार कांबळे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन देवानंद गजापुरे,आभार नपं सभापती राधेशाम भेंडारकर यांनी केले.यावेळी बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.