पुरेशा जागेअभावी, राजकिय चक्रव्युहात अडकले मेडिकल कॉलेज
वर्धा (Government Medical) : हिंगणघाट तालुक्यात मंजुर झालेले शासकिय वैद्यकिय महाविद्यालय (Government Medical) , हिंगणघाट शहरात पुरेशा जागे अभावी व राजकिय चक्रव्युहात अडकलेले असल्यामुळे जिल्ह्यातील ईतरत्र शहरात किंवा जिल्ह्याबाहेर स्थलांतरीत होऊ नये म्हणुन, हिंगणघाट शहरापासुन अवघ्या 10 किमी अंतरावर असलेल्या समुद्रपूर तालुक्यातील जाम येथे नागपूर हैद्राबाद महामार्गालगत (Agriculture Department) कृषी विभागाच्या अखत्यारीत असलेली शासनाची जमीन पडीक अवस्थेत आहे.
शासकीय वैद्यकिय महाविद्यालय: हिंगणघाटपासुन अवध्या 10 कि.मी. अंतरावर
सदर जमीनीचा उपयोग शेतक-यांसाठी होत नसला तरी, (Hinganghat Medical Collage) शासकीय वैद्यकिय महाविद्यालयाच्या माध्यमातुन समुद्रपूर तालुका, सिंदी रेल्वे व हिंगणघाट शहरासह हिंगणघाट तालुक्यातील किमान 350 गावातील 3 लाख लोकांना आरोग्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरू शकते. एवढेच नव्हे तर नागपूर- चंद्रपूर राज्य महामार्ग, हिंगणघाट – गिरड-उमरेड मार्ग व ईतरही अनेक मार्गापासुन हाकेच्या अंतरावर आहे. जाम हा पुर्व विदर्भात प्रसिध्द चौक असुन हिंगणघाट विधानसभेचा मध्यभाग आहे. त्यामुळे इमरजेंसी व अपघातग्रस्त रूग्णांवर तातडीने उपचार व्हावा. या दृष्टीने ही जागा इतर जागेपेक्षा महत्वपुर्ण आहे. तसेच वैद्यकिय महाविद्यालयातील विद्यार्थी, कर्मचारी तसेच रूग्णांना ये-जा करण्यास सोईचे होणार आहे.
एकंदरीत जाम येथे वैद्यकिय महाविद्यालय झाल्यास ख-या अर्थाने संजीवनी ठरेल. याकरीता जाम येथे (Agriculture Department) कृषी विभागाच्या अखत्यारीत असणारी महाराष्ट्र शासनाची 52 एकर जमीन शासकिय वैद्यकिय महाविद्यालयाच्या (Hinganghat Medical Collage) उभारणीसाठी उपयोगात आणावी, अशी मागणी समुद्रपूर वैद्यकीय महाविद्यालय संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आली आहे.