कोरेगाव,चोप/गडचिरोली (MLA Ramdas Masram) : देसाईगंज तालुक्यात अजून पर्यंत शासकीय धान खरेदी सुरू झालेली नाही दिवाळीच्या एक महिन्यापूर्वी यावर्षी लोकांचे धान्य निघाले असून ते मुगाच्या पावसाप्रमाणे शासकीय धान्य खरेदीची वाट पाहत असताना तालुक्यातील फक्त कोरेगाव येथील राष्ट्रसंत बहुउद्देशीय अभिनव सेवा सहकारी संस्था चे आज आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम (MLA Ramdas Masram) यांच्या हस्ते व माजी पंचायत समिती सभापती परसराम टिकले माजी जि प सदस्य तथा जिल्हा काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष नंदू नरोटे तालुका काँग्रेस कमिटीअध्यक्ष राजेंद्र बुल्ले कोरेगावचे माजी सरपंच प प्रशांत किलणाके व शेतकऱ्यांच्या उपस्थितीत पार पडला.
राष्ट्रसंत बहुउद्देशीय अभिनव सहकारी संस्था केंद्राच उद्घाटनाप्रसंगी संस्थेच्या वतीने शुभारंभ प्रसंगी विक्रीस आणलेल्या शेतकऱ्यांचा शाल श्रीफळ देऊन आमदार रामदास मसराम (MLA Ramdas Masram) यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी शेतकऱ्यांनी प्रति हेक्टरी मर्यादा वाढवण्याची मागणी आमदार साहेबाकडे केली व आमदार साहेबांनी याची मागणी आपण लावून धरू, अशी ग्वाही दिली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष दिनेश कुर्जेकर सचिव विशाल कुर्जेकर अरुण राजगिरे राकेश टिकले मदन बनपुरकर धनंजय नाकाडे टीकाराम निमकर व तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते